लॉकडाउनमुळे विविध ठिकाणी अडकलेल्या स्थलांतरित मजुरांना त्यांच्या घरी सुखरुप पोहोचवण्याचं काम अभिनेता सोनू सूद गेल्या काही दिवसांपासून नि:स्वार्थपणे करत आहे. सोनू सूदच्या या कामाचं सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे. "ज्या लोकांनी आपली घरं, आपले रस्ते, आपले ऑफिस बांधले, त्यांना असंच सोडू नाही शकत असं मला वाटलं. त्यामुळे मी त्यांना घरी पोहोचवण्यासाठी व्यवस्था करू लागलो. हे माझं कर्तव्य आहे आणि हे काम करताना मी फार खूश आहे," अशी प्रतिक्रिया त्याने 'लोकसत्ता ऑनलाइन'शी बोलताना दिली. सोनू सूदचे मित्र-मैत्रीण, कुटुंबीय त्याला या कामात मदत करत आहेत. त्याची एक संपूर्ण टीमच स्थलांतरितांसाठी बसेसची व्यवस्था करण्यासाठी काम करतेय. स्वत: सोनू या मजुरांना भेटतो आणि त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्थाही करतो. या सर्व मदतकार्यामुळे पडद्यावर क्रूर खलनायक साकारणारा सोनू सूद आता खऱ्या आयुष्यात 'हिरो' बनला आहे. पाहा तो काय म्हणाला. हे मदतकार्य सुरू करण्यामागे आईची प्रेरणा असल्याचं तो सांगतो. त्याचसोबत स्थलांतरित मजुरांना कधीपर्यंत मदत करणार याचंही उत्तर त्याने या मुलाखतीत दिलं आहे.