आपल्या समाजामध्ये असे काही विषय असतात, ज्यांवर बोलायची गरज असतानाही बोललं जात नाही. हे विषय आपण सतत टाळत असतो. या विषयांना हात घालून त्यांच्यावर चित्रपट तयार करणे ही आयुष्मान खुरानाची खासियत आहे. ‘विकी डोनर’ या चित्रपटाच्या माध्यमातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटाची कथा एका स्पर्म डोनरच्या अवतीभवती फिरते. त्याचे ‘दम लगा के हैशा’, ‘शुभ मंगल सावधान’, ‘बधाई हो’, ‘आर्टिकल १५’, ‘ड्रीम गर्ल’, ‘बाला’, ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ असे चित्रपट समाजामधल्या टॅबू विषयांवर आधारले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नुकताच आयुष्यमान खुरानाच्या ‘डॉक्टर जी’ (Doctor G) या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये त्याने एका स्त्रीरोगतज्ञाची व्यक्तिरेखा साकारली आहे. या चित्रपटामध्ये त्याच्यासह रकुल प्रीत सिंह, शैफाली शहा आणि शीबा चड्ढा असे कलाकार दिसणार आहेत. देशभरात १ जुलै हा दिवस ‘डॉक्टर्स डे’ म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी त्याने चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर पोस्ट केले होते. या चित्रपटाच्या माध्यमातून आयुष्यमानने ‘उद्य गुप्ता’ नावाच्या स्त्रीरोगतज्ञाची (Gynecologist) व्यथा मिश्कीलपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात एका बाईच्या ओरडण्याने होते. त्यावेळी आयुष्यमान त्या बाईचे चेकअप करत असतो. ओरडण्याच्या आवाजामुळे डॉक्टर माझ्या बायकोशी गैरवर्तन करत असल्याची शंका तिच्या नवऱ्याला येते आणि तो आयुष्यमानला मारु लागतो. या पहिल्याच सीनवरुन देशभरातल्या पुरुष स्त्रीरोगतज्ञांची दुविधा दिसून येते. ट्रेलर पाहिल्यावर असे लक्षात येते की, उद्य गुप्ता या मेडिकलच्या विद्यार्थ्याला काही कारणांमुळे स्त्रीरोग (Gynecology) हा विषय घ्यावा लागतो. तो विषय बदलून घेण्यासाठी धडपड करतो, पण काहीही होत नसल्यामुळे तो शेवटी परिस्थिती मान्य करतो. या ट्रेलरचा शेवट एका गंभीर विषयाच्या विनोदाने होतो.

आणखी वाचा – “मी दिल्लीवाला आहे, मुंबईतल्या लोकांना खिशात घेऊन…” शाहरुख खानचा व्हिडिओ व्हायरल

‘डॉक्टर जी’ हा चित्रपट १४ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trailer of ayushmann khurranas upcoming film doctor g has been released yps
First published on: 20-09-2022 at 14:13 IST