बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान सध्या ब्रह्मास्त्रमधील त्याच्या भूमिकेमुळे चर्चेत आहे. शाहरुख खान मूळचा दिल्लीचा आहे. चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी व नाव कमवण्यासाठी त्याने मुंबई गाठली. तो अनेकवेळा त्याच्या मुलाखतीत त्याच्या संघर्षाच्या दिवसांची आठवण काढतो, त्याबद्दल बोलत असतो. मुंबईने शाहरुखला काम, प्रसिद्धी सर्वच दिलंय. तसेच त्याचं दिल्लीवरचं प्रेम सर्वश्रुत आहे. सध्या शाहरुख खानचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो पहिल्यांदा मुंबईत आल्यावर मुंबईतील लोकांप्रती त्याचा दृष्टिकोन काय होता हे सांगताना दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या व्हिडिओमध्ये टॉक शोची होस्ट प्रीती झिंटाशी शाहरुख संवाद साधताना दिसतोय. तो म्हणतो, “मी खूप भांडायचो. मी दिल्लीवाला आहे. मी जेव्हा मुंबईत आलो, तेव्हा मला इथली गुंडागिरी दिसली, तेव्हा मला नवल वाटलेलं. यावेळी तो शोदे असा शब्द उच्चारतो. प्रिती त्याला त्या शब्दाचा अर्थ विचारते तेव्हा शाहरुख खान याचा अर्थ सांगतो आणि म्हणतो, “शोदे म्हणजे अबे साले, अशा लोकांना आम्ही खिशात घेऊन फिरत असतो. म्हणजे दिल्लीत आम्ही असेच होतो. दिल्लीची गुंडगिरी अशी होती. इथले लोक असे चालतात, हे पाहून मला आश्चर्य वाटायचे. मुंबईतील लोकांची भांडणं पाहून मला हसू यायचं, इथल्या लोकांना भांडायचं कसं हे देखील माहित नाही,” असा अनुभव शाहरुखने सांगितला.

मुंबईतले लोक फार प्रेमाने आणि आदराने शिवीगाळ करतात. आम्हा दिल्लीकरांना तर यांची भांडणं ही भाडणं वाटतच नाही. की, येथील लोकही खूप शिवीगाळ करतात, असं शाहरुख व्हिडिओमध्ये म्हणतो. दरम्यान, शाहरुखचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओला लाखोंच्या संख्येने लाईक्स मिळाले आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shahrukh khan old video viral saying i am from delhi keep mumbaikars in pocket hrc
First published on: 20-09-2022 at 12:59 IST