काही काळापासून संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘स्पिरिट’ हा चित्रपट चर्चेत आहे. यापूर्वी प्रेक्षकांना या चित्रपटात दीपिका पादुकोण आणि साऊथ स्टार प्रभासची जोडी पाहायला मिळणार होती. परंतु अलीकडेच बातमी आली की, दीपिकाने या चित्रपटातून माघार घेतली आहे. त्याच वेळी आता निर्मात्यांनी या चित्रपटासाठी एक नवीन अभिनेत्री शोधली आहे. त्यांनी स्वतः एक पोस्ट शेअर करून याबाबतची घोषणा केली. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून तृप्ती डिमरी आहे, जी दीपिकाची जागा घेणार आहे.
संदीप रेड्डी वांगा यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडल इन्स्टाग्रामवर यासंबंधीची पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितले आहे की, तृप्ती डिमरी ‘स्पिरिट’मध्ये दिसणार आहे. हे शेअर करताना त्यांनी, ‘माझ्या चित्रपटाची मुख्य अभिनेत्री आता ऑफिशियल झाली आहे’, असे कॅप्शनमध्ये लिहिले आहे. प्रभास आणि तृप्तीचा हा पहिलाच चित्रपट असणार आहे, ज्यामध्ये प्रेक्षकांना त्यांची ऑनलाइन केमिस्ट्री पाहायला मिळेल.
कधी प्रदर्शित होणार हा चित्रपट?
हा चित्रपट संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित करणार आहेत. त्याचबरोबर भूषण कुमार व प्रणय रेड्डी वांगा हे चित्रपटाचे निर्माते आहेत. यापूर्वी तृप्तीने संदीप रेड्डी वांगा व भूषण कुमार यांच्या ‘अॅनिमल’मध्ये काम केले होते. टी-सीरिज व भद्रकाली पिक्चर्सद्वारे समर्पित ‘स्पिरिट’ हा चित्रपट मोठ्या प्रमाणात जगभरात मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. या चित्रपटात प्रभास एका कणखर पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात तो ड्रग्ज माफियांशी लढताना दिसणार असून, चित्रपट २०२६ मध्ये प्रदर्शित होणार आहे.
दीपिका पदुकोण ‘स्पिरिट’मध्ये प्रभासबरोबर दिसणार होती; पण नंतर बातमी आली की, दीपिकाने ४० कोटींच्या मानधनासह फक्त आठ तासांची शिफ्ट मागितली, ज्यामुळे तिचे निर्मात्यांशी मतभेद झाले. अशा परिस्थितीत निर्मात्यांनी तिला ‘अनप्रोफेशनल’ म्हटले. त्यावर दीपिकाकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही आणि आता तिची जागा तृप्तीने घेतली आहे.
तृप्ती डिमरीनेही इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. तिच्या या पोस्टवर चात्यांबरोबर अभिनेता प्रभासनेही कमेंट केली आहे. प्रभासने कमेंटमध्ये ‘स्पिरिट’ लिहिले आहे आणि एक फायर व फायरी हार्ट इमोजी बनवला आहे. त्याच वेळी, तृप्ती डिमरीच्या चाहत्यांनी पोस्टवर हार्ट व किस इमोजीद्वारे त्यांचा पाठिंबा दर्शविला आहे.