‘…अन् बाकी सगळे कोमात’ वल्ली आणि माई मावशीचा धम्माल व्हिडीओ पाहिलात का?

माई मावशी आणि वल्लीचा हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय.

tu tevha tashi, abhigya bhave, pushpavalli, swapnil joshi, shilpa tulaskar, ujwalla jog, तू तेव्हा तशी, स्वप्नील जोशी, पुष्पवली, माई मावशी, अभिज्ञा भावे, शिल्पा तुळसकर, उज्ज्वला जोग
ऑनस्क्रीन भांडणाऱ्या वल्ली आणि मावशींमध्ये ऑफस्क्रिन मात्र खूप चांगलं बॉन्डिंग आहे.

‘तू तेव्हा तशी’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. या मालिकेतील सौरभ आणि अनामिकाची जोडी आणि त्यांच्या फुलणार प्रेम तर प्रेक्षकांना आवडतंच आहे. पण त्याच सोबत या मालिकेत एक जोडी अशी आहे ज्यांची नोकझोक सतत चालू असते ते म्हणजे माई मावशी आणि वल्ली. ऑन-स्क्रीन जरी या दोघी भांडत असल्या तरी ऑफस्क्रीन त्यांची धमाल चालू असते आणि त्यांचा पुरावा अभिज्ञा भावेनं सोशल मीडियावर शेअर करत असलेल्या मजेदार व्हिडीओमध्ये पाहायला मिळतो.

सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असणारी अभिनेत्री अभिज्ञा भावे सेटवरील मजा-मस्ती व्हिडिओजच्या रूपात आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकताच इन्स्टाग्रामवर माई मावशी आणि वल्ली यांचा एक मजेदार व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. जो पाहिल्यावर चाहत्यांना हसू आवरेनासं झालंय. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

आणखी वाचा- ‘धाकड’ गर्ल कंगना रणौतनं स्वतःला दिलं खास गिफ्ट, खरेदी केली महागडी कार

या व्हिडिओ मध्ये अभिज्ञा म्हणजेच वल्ली ही माई मावशींना म्हणते कि “अहो मावशी आपल्या समोरच्या चाळीचे मालक कोमात गेले.” त्यावर मावशी मिश्कीलपणे म्हणतात, “श्रीमंत माणसं कुठेपण जातात.” झी मराठीच्या अधिकृत पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून त्याला त्यांनी ‘मावशी जोमात..बाकी सगळे कोमात!’ असं मजेदार कॅप्शन देखील दिलं आहे.

आणखी वाचा- अमिताभ बच्चन- शाहरुख खानसह अन्य २ अभिनेत्यांच्या विरोधात खटला दाखल, वाचा नेमकं काय घडलं

दरम्यान वल्ली आणि मावशी या ऑनस्क्रीन जरी एकमेकांशी वाद घालत असल्या, एकमेकांशी भांडत असल्या तरी ऑफस्क्रीन त्यांचं बॉण्डिंग खूपच चांगलं आहे आहे हे त्यांच्या ऑफस्क्रीन चाललेल्या धमाल मजा मस्ती वरून कळून येतं. अभिज्ञाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावर चाहत्यांचा धम्माल प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Tu tevha tashi actress abhigya bhave funny video goes viral mrj

Next Story
आर. माधवनने Cannes फिल्म फेस्टिव्हलमध्ये केले पंतप्रधान मोदींचे कौतुक, म्हणाला “हा नवीन भारत…”
फोटो गॅलरी