बॉलिवूड अभिनेत्रींनप्रमाणे छोट्या पडद्यावरील अभिनेत्रीदेखील चर्चेत असतात. हिना खान ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून तिला प्रसिद्धी मिळाली. तिच्या खासगी आयुष्यामुळे व बोल्ड लूकमुळे कायमच चर्चेत असतात.
हिना खान सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. हिना खानचे व्हिडिओ आणि फोटो अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होतात आणि यापूर्वीही तिला अनेकदा ट्रोल करण्यात आले आहे. आता, हिना खानने पांढऱ्या मोनोकिनीमधले फोटो शेअर केले आहेत. सध्या ती मालदीव येथे सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसून येत आहे. हिना खानच्या फोटोंना नेटकऱ्यांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. एकीकडे, काहींनी तिच्या बोल्ड लूकबद्दल तिची प्रशंसा केली, तर काहींनी तिला ट्रोल केले आहे.
फोटोतल्या बॉलिवूडच्या ‘या’ दिग्गज अभिनेत्याला ओळखलंत का? आगामी वेबसीरिजमध्ये दिसणार विशेष भूमिकेत
तिने फोटो शेअर करताच नेटकऱ्यांनी कमेंट करण्यास सुरवात केली आहे. एकाने लिहले आहे “खूपच बोल्ड” तर दुसऱ्याने लिहले आहे, “नेहमीप्रमाणे सुंदर”, मात्र ती धर्माने मुस्लीम असल्याने तिला ट्रोल करण्यात आले आहे. एकाने लिहले आहे, “मुस्लीम स्त्री असे कपडे कशी काय परिधान करू शकते?” आणखीन एकाने लिहले आहे “ही कुठे मुस्लीम आहे? फक्त नावाने आहे”. तिसऱ्याने लिहले आहे “बहुदा ती विसरली असावी ती धर्माने मुस्लीम आहे.”
‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतील अक्षरा या भूमिकेने तिला प्रसिद्धी मिळवून दिली होती. ‘कसोटी जिंदगी की’ या मालिकेतील तिची भूमिकाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. हिना ‘बिग बॉस हिंदी’च्या ११व्या पर्वातही सहभागी झाली होती. नुकताच तिने एक फोटो शेअर केला आहे ज्यावरून तिला ट्रोल करण्यात आले आहे.