हटके फॅशनसेन्समुळे सतत चर्चेत असणारी उर्फी जावेद कधी काय करेल याचा नेम नाही. इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करत सगळ्यांचं लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यात ही सरस आहे. प्रत्येक दिवशी ती नवनवीन लूकमध्ये दिसून येते. तिचे अनेक व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना आपण पाहतो. कधी कधी उर्फी फॅशनच्याबाबतीत कहरच करते. ती कधी कोणते कपडे परिधान करेल याचा कोणीच अंदाज लावू शकत नाही. आता तर तिने चक्क प्लॅस्टिक टॉप परिधान केला आहे.

आता तुम्ही म्हणाल प्लॅस्टिकचा टॉप कोण परिधान तरी करतं का? पण हे अगदी खरं आहे. उर्फीने स्वतःच याबाबतचा व्हिडीओ इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केला आहे. यामध्ये हा टॉप कसा तयार करण्यात आला हे ती सांगत आहे. “तव्यावर कपडा गरम करूनही मी ड्रेस तयार करेन माझी इच्छा असं काही दिवसांपूर्वी मी म्हटलं होतं. खरंच हा टॉप मी गॅसवर गरम करून तयार केला आहे. हा टॉप प्लॅस्टिकचा आहे. गॅसवर वितळून मी तो माझ्या शरीराच्या आकाराचा तयार केला आहे.” असे उर्फीने म्हटले आहे.

उर्फीची ही फॅशन पाहून लगेचच अनेक जणांनी तिला ट्रोल करण्यासही सुरुवात केली. पण नेहमीप्रमाणेच उर्फीने ट्रोलर्सकडेही दुर्लक्ष केलं आहे. गुलाबी रंगाचा हा उर्फीचा टॉप प्लॅस्टिकचा आहे म्हटल्यावर नेटकऱ्यांनी विविध कमेंट्स करायला सुरुवात केली. या टॉपबरोबर तिने पँट, मॅचिंग हिल्स घातली आहे. पण हा प्लॅस्टिक ड्रेस परिधान करण्याचा तिचा प्रयत्न पूर्णपणे फसला आहे.

आणखी वाचा – “हिंदी चित्रपट साऊथमध्ये डब करा अन्…” प्रसिद्ध दिग्दर्शकाने अक्षय-अजयला दिलं आव्हान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उर्फीला फॅशनच्या बाबतीत वेगवेगळे प्रयोग करायला आवडतात. बऱ्याचदा तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत असला तरी ती वेगळ्या प्रकारचे ड्रेस परिधान करण्यास प्राधान्य देते. सोशल मीडियावर तर तिचे हजारो चाहते आहेत.