सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद व भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्यातील वाद संपतच नाही आहे. कपड्यांवर आक्षेप घेतल्यामुळे उर्फीने चित्रा वाघ यांना सोशल मीडियावर उत्तर दिलं होतं. त्यानंतर उर्फीने पुन्हा एक ट्वीट केलं आहे.

उर्फीने तिच्या ट्वीटद्वारे चित्रा वाघ यांना पुन्हा डिवचलं आहे. “मेरा डिपी धांसू, चित्रा मेरी सासू”, असं ट्वीट उर्फीने केलं होतं. त्यानंतर आता पुन्हा तिने एका पाठोपाठ एक असे दोन ट्वीट केले आहेत. “उर्फीला दिला त्रास, चित्रा अशी कशी गं तू सास”, असं तिने ट्वीटमध्ये चित्रा वाघ यांचा एकेरी उल्लेख केला आहे.

हेही वाचा>> “दोन मुलांची आई असूनही…”, राज ठाकरेंच्या पत्नीने जिनिलीयाबाबत केलेलं विधान चर्चेत

उर्फी रायमिंग शब्द जुळवून चित्रा वाघ यांच्यावर ट्वीटमधून टीका करत आहे. दुसऱ्या ट्वीटमध्ये तिने चित्रा वाघ यांना होणारी सासू असं म्हटलं आहे. “चित्राताई मेरी खास, फ्यूचर में होनेवाली सास”, असं म्हणत उर्फी जावेद पुन्हा बरळली आहे.

हेही वाचा>> ‘चित्रा मेरी सासू’ म्हणणाऱ्या उर्फीला चित्रा वाघ यांचे सडेतोड प्रत्युत्तर, म्हणाल्या “छत्रपतींच्या महाराष्ट्रात…”

हेही पाहा>> उर्फी जावेद सासू म्हणतेय त्या चित्रा वाघ यांच्या मुलाला पाहिलंय का? पाहा फोटो

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उर्फी जावेद प्रकरणावर चित्रा वाघ पत्रकार परिषदेतूनही भाष्य करत आहेत. उर्फीवर कारवाई करणार असल्याचंही त्या म्हणाल्या आहेत. आता उर्फीने केलेल्या ट्वीटमुळे त्यांच्यातील वाद पुन्हा वाढणार असल्याचं दिसत आहे.