सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद तिच्या अतरंगी कपड्यांमुळे कायमच चर्चेत असते. उर्फीचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावरही प्रचंड व्हायरल होत असतात. चित्रविचित्र कपड्यांमुळे ओळखली जाणारी उर्फी सध्या एका वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आली आहे. उर्फीला Laryngitis (लॅरिन्जायटिस) हा आजार उद्भवला आहेच, त्याचबरोबरीने तिला डोळ्यांच्याबाबत समस्या निर्माण झाली आहे.

उर्फी सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. पोस्टच्याबरोबरीने ती सामाजिक मुद्द्यांवर भाष्य करत असते. उर्फीने तिचा फोटो पोस्ट केला आहे, ज्यात तिच्या डोळ्याखाली जखमा दिसत आहेत. तिने तिच्या पोस्टमध्ये स्पष्ट केले आहे की या जखमा मारहाणीमुळे नसून तिच्या डोळ्यांखालील फिलरमुळे झाली आहे. तिने लिहिले, “म्हणून काल मी हा मेक-अप लपवला! मला स्वतःचा अभिमान आहे… नाही, मला कोणीही मारले, मला डोळ्यांखालील फिलर्स आले आणि जखम झाली.हा सर्व डार्क सर्कल क्रीम्स एक घोटाळा आहे. ते अजिबात खरेदी करू नका” असे तिने लिहले आहे.

“मला माफ करा…” सोनू सूदचे ‘ते’ ट्वीट चर्चेत

उर्फी काल रात्री तिच्या मैत्रिणींबरोबर एका पार्टीत गेली होती ज्यात ती काळ्या रंगाच्या ब्रॅलेट आणि स्कर्टमध्ये दिसली होती. तिने केवळ तिच्या मित्रांबरोबर नाही तर कार्यक्रमाच्या बाहेर एका महिला चाहत्याबरोबर सेल्फी घेतले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अभिनेत्री उर्फी जावेद हिने गेल्या काही वर्षात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिच्या लूक्समुळे ती नेहमीच चर्चेत असते. परंतु मनोरंजनसृष्टीत पदार्पण करताना तिला अनेक कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागलं आहे. उर्फीने ‘मेरी दुर्गा’ आणि ‘बडे भैया की दुल्हनिया’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. तिने बिग बॉस ओटीटी सीझन १ मध्ये देखील भाग घेतला होता.