भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदच्या कपड्यांवर आक्षेप घेतला. त्यानंतर चित्रा वाघ व उर्फीमधील वाद रंगत गेला. उर्फीने सोशल मीडियाच्या माध्यमातून चित्रा वाघ यांना उत्तर देण्यास सुरुवात केली. तसेच काहीही झालं तरी माझा नंगानाच सुरू राहणार असंही उर्फीने म्हटलं. या वादामध्ये राजकीय मंडळीही आपलं मत व्यक्त करताना दिसत आहेत. पण उर्फी मात्र रोज नवनवीन पोस्ट शेअर करताना दिसत आहे.

आणखी वाचा – “त्याच मुलीबरोबर तो…” शिव ठाकरेच्या लग्नाबाबत आईचा खुलासा, लेकाच्या रिलेशनशिपबाबतही केलं भाष्य

उर्फीच्या फॅशनची सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगताना दिसते. उर्फी परिधान करत असलेले कपडे हटके व अधिक बोल्ड असतात. बऱ्याचदा ती तिचे कपडे स्वतःच डिझाइन करते. यादरम्यानचे अनेक व्हिडीओही उर्फी इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर करताना दिसते. पण आता तिने एक विचित्र कृत्य केलं आहे.

उर्फी जावेदचं विचित्र कृत्य

उर्फीने विमानतळावर जाताच तिच्याबरोबर असलेल्या एका व्यक्तीने तिचा व्हिडीओ काढला. यावेळी उर्फी कॅमेऱ्यासमोरच शरीराचा एक भाग दाखवतााना दिसत आहे. शिवाय ती यामध्ये हसतानाही दिसते. तिचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यासा सुरुवात केली आहे.

आणखी वाचा – “उर्फी जावेदचा नंगानाच सावित्रीच्या लेकींना..” चित्रा वाघ पुन्हा एकदा आक्रमक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाहा व्हिडीओ

उर्फीच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी नकारात्मक कमेंट केल्या आहेत. तर अनेकांनी उर्फीने कॅमेऱ्यासमोर केलेलं हे कृत्य अतिशय वाईट असल्याचं म्हटलं आहे. खरं तर उर्फी ट्रोलिंगकडे पूर्णपणे दुर्लक्ष करताना दिसते. मात्र तिचा हा नवा व्हिडीओ पाहून वाद आणखीन चिघळणार का? हे पाहावं लागेल.