आजकाल कपड्यांचा कोणत्याही गोष्टीची फॅशन होऊ शकते. फाटके कपडे घालणे अवमानकारक वाटायचे मात्र आजकाल सर्रास जीन्स पॅन्ट फाटक्या घातल्या जातात. अतरंगी फॅशनसाठी ओळखली जाणारी उर्फी रोज वेगवेगळ्या लुकमध्ये दिसते. याशिवाय ती इंस्टाग्रामवर चाहत्यांसह तिच्या मनमोहक स्टाइलचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. कधीकधी यामुळे तिला टीकेलाही सामोरे जावे लागते. मात्र सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगमुळे उर्फीला फारसा फरक पडत नाही. ती टीकाकारांना सडेतोड उत्तर देतानाही दिसते.

नुकतेच तिने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर फोटो शेअर केले आहेत. तिने परिधान केलेला ड्रेस बघून नेटकरी हैराण झाले आहेत. फोटोमध्ये तुम्ही उर्फी जावेदने क्रॉप टॉप आणि शॉर्ट स्कर्ट घातलेला दिसत आहे. हा पोशाख सिम कार्ड चिकटवून तयार केला जातो. निळ्या आणि पिवळ्या स्ट्रॅपच्या टॉप-स्कर्टमध्ये उर्फी आकर्षक दिसत आहे. तसेच तिने हाय हिल्सचे बूट परिधान केले आहेत.

सचिन तेंडुलकरही आहे ‘अशी ही बनवाबनवी’चा फॅन; स्वतः खुलासा करत म्हणाला होता, “असे चित्रपट…”

उर्फीने याबाबत आपल्या स्टोरीमध्ये खुलासा केला आहे. तिने लिहले आहे हे सिमकार्डपासून बनवले आहे यावर तुमचा विश्वास बसेल का? तिचा हा विचित्र लूक बघून तिचे चाहते नेटकरीदेखील अवाक झाले आहेत. उर्फी जावेद नेहमीच तिच्या लूकमध्ये क्रिएटिव्हिटी दाखवते. तिचा ड्रेसिंग सेन्स ट्रोल झाला असेल, पण तो लुक तयार करण्यात उर्फीची मेहनत खूप असते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
urfi javed

शॉर्ट ड्रेस असो किंवा विचित्र लिपस्टिक यामुळे उर्फी कायमच लोकांचं लक्ष वेधून घेत असते. तिच्या अतरंगी आणि शॉर्ट ड्रेसमुळे अनेकदा तिला सोशल मीडियावर ट्रोलही व्हावं लागतं मात्र उर्फी अशाप्रकारच्या टीकेकडे दुर्लक्ष करताना दिसते. “लोक मला ट्रोल करत असले तरीही ते माझ्या बद्दल बोलतात. नकारात्मक का असेना मला त्यातून प्रसिद्धी मिळते आणि हेच माझ्यासाठी महत्त्वाचे आहे.” असं तिने एका मुलाखतीत सांगितलं होतं.