उर्फी जावेद ही मॉडेल अभिनेत्री सध्या चांगलीच चर्चेत आहे. उर्फी आणि चित्रा वाघ यांच्यातील वाद रोज वेगळी वळणं घेत असताना आता उर्फीने आध्यात्मिक गुरु सद्गुरु यांच्यावर निशाणा साधला आहे. सद्गुरू यांची एक व्हिडिओ क्लिप शेअर करत उर्फीने त्यांच्यावर टीका केली आहे. इतकंच नाही तर त्यांचा ‘मेंदू’ छोटा आहे असं भाष्यसुद्धा तिने केलं आहे. यामुळे उर्फी पुन्हा चर्चेत आली आहे.

उर्फीने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये सद्गुरू LGBTQ समुदायाबद्दल आणि त्यांच्याकडून होणाऱ्या कॅम्पेनबद्दल त्यांचं मत मांडत आहेत. ते म्हणतात की “आज या समुदायाच्या विरोधात काही लोक आहेत तर काही लोक याचं समर्थन करत आहेत, त्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे यासाठी जगभरात सुरू असलेली मोहीम. ही मोहीम कुठेतरी थांबायला हवी. या समुदायातील लोकांची संख्या ही फार तुरळक आहे, आणि या मोहिमेमुळेच ती दिवसागणिक वाढते आहे. लैंगिकता ही एक बायोलॉजीकल प्रक्रिया आहे. निसर्गाने तुम्हाला जसा जन्म दिला आहे तो न स्वीकारता तुम्ही वेगळ्या मार्गाने जाण्याचा विचार करत असाल तर तो प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे.”

आणखी वाचा : बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करणारा ‘दृश्यम २’ ओटीटीवर धुमाकूळ घालण्यास सज्ज; वाचा कधी आणि कुठे पाहता येणार?

हा व्हिडिओ शेअर करत उर्फीने संतप्त प्रतिक्रिया दिली. तिने या पोस्टमध्ये लिहिलं, “जे कुणी यांना फॉलो करत आहेत त्यांनी तातडीने मला अनफॉलो करा. यांच्यामते LGBTQ ही एक प्रचारकी मोहीम आहे. हे अगदी बरोबर आहे, कारण या मोहिमेत सहभाग घेणारी मंडळी त्यांच्या लैंगिकतेबद्दल मोकळेपणाने त्यांचं मत मांडू शकत आहेत. LGBTQ समुदायातील संख्या अजिबात छोटी नाही, पण बहुदा यांचा मेंदू छोटा(संकुचित) आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
urfi javed post 2
urfi javed post 3
urfi javed post 3

शिवाय LGBTQ समुदायाला समर्थन देत पुढे उर्फीने आणखी एक पोस्ट केली. या पोस्टमध्ये ती म्हणाली, “या प्रकारच्या प्रोपगंडाला अजिबात खतपाणी घालू नये. आज या समुदायाला आपल्या पाठिंब्याची गरज आहे. कित्येक शतकांहून अधिक काळ यांनी त्यांच्या लैंगिकतेबद्दल कुठेच वाच्यता केली नाही. आज या समुदायातील लोकांना मोकळेपणाने येऊन स्वतःचं अस्तित्त्व स्वीकारण्यासाठी अशा मोहिमांची फार आवश्यकता आहे.”