उर्फी जावेद तिचे विचित्र कपडे आणि फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असते. कधी एअरपोर्ट तर कधी स्वतःच्याच घराच्या खाली उर्फी जावेद नेहमीच नव्या लुकमध्ये स्पॉट होते. सोशल मीडियावर तिचे व्हिडीओ आणि फोटो नेहमीच चर्चेत असतात. पण उर्फीला साडी, मांगटीका, कपाळावर टिकली आणि हातात बांगड्या अशा अवतारात फारच कमी लोकांनी पाहिलं असेल. सध्या उर्फी जावेदचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात ती पारंपरिक लुकमध्ये दिसत आहे.

सध्या सोशल मीडियावर आपल्या विचित्र फॅशनमुळे चर्चेत राहणाऱ्या उर्फी जावेदनं याआधी अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केलं आहे. यापैकी एक मालिका आहे, ‘ए मेरे हमसफर.’ या मालिकेतील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि या व्हिडीओमध्ये उर्फी जावेद संस्कारी पारंपरिक लुकमध्ये दिसत आहे. तिच्या या लुकचं सोशल मीडियावर खूप कौतुकही होताना दिसत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये उर्फी जावेदनं जांभळ्या रंगाचा लहंगा परिधान केला आहे. कपाळावर टिकली, मांगटीक आणि हातात बांगड्या घातलेली उर्फी खूपच सुंदर दिसत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर रोज विचित्र फॅशनचे कपडे परिधान करणारी उर्फी जावेद हीच आहे यावर विश्वास बसत नाही. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर उर्फीच्या या लुकचं कौतुक केलं जात आहे.