अभिनेत्री उर्फी जावेद तिच्या बोल्ड कपड्यांमुळे कायमच चर्चेत आली आहे. उर्फीला अनेकदा विचित्र कपड्यांमध्ये स्पॉट करण्यात आलंय. या कपड्यांमुळे उर्फीला नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगचाही सामना करावा लागला आहे. नेटकऱ्यांनी कितीही ट्रोल केलं तरी उर्फी मात्र या ट्रोलिंगकडे दूर्लक्ष करते. नुकताच उर्फीने बॅकलेस टॉपमधील एक व्हि़डीओ शेअर केला असून पुन्हा एकदा नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलंय.
सोशल मीडियावर कायम बोल्ड फोटो शेअर करणाऱ्या उर्फीने निकताच एक व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलाय. यात तिने पांढऱ्या रंगाची पॅन्ट आणि गुलाबी रंगाचं बॅकलेस टॉप परिधान केलंय. उर्फीचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झालाय. तर तिच्या बॅकलेस टॉपवरून तिला अनेकांनी ट्रोल केलंय.
‘My Love’ म्हणत वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या केएल राहुलच्या पोस्टवर अथिया शेट्टीची कमेंट; म्हणाली…
उर्फीच्या या व्हिडीओवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, “शरीर दाखवणं म्हणजे फॅशन नाही. म्हणजे ताई जरा कपड्यांची चांगली फॅशन करा ना.” तर दुसरा एक युजर म्हणाला, “बॉलिवूड निर्माच्याचं लक्ष वेधून घेण्यासाठी करतेय” आणखी एक युजर म्हणाला, “हे तरी कशाला घालायचं.. हद्द आहे फॅशनच्या नावाखाली काहीही घालतात.”

युर्फीच्या या व्हि़डीओवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, “ताई हद्द केली कधी तरी पूर्ण कपडे घालत जा” अनेक नेटकऱ्यांनी उर्फीच्या या व्हिडीओवर कमेंट करत तिला ट्रोल केलंय. ट्रोल होण्याची उर्फीची ही काही पहिली वेळ नव्हे. अनेक वेळा उर्फीला तिच्या लूकवरून ट्रोल करण्यात आलंय.