आपल्या ड्रेसिंग सेन्स आणि अतरंगी फॅशनमुळे उर्फी जावेद नेहमीच चर्चेत असते. अनेकदा तिच्या अतरंगी कपड्यांमुळे सोशल मीडियावर तिला ट्रोलही व्हावं लागतं. आताही उर्फीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर अनेक युजर्सनी भन्नाट कमेंट केल्या आहे. या व्हिडीओमुळे उर्फी जावेद पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये बीचवर असलेली दिसत आहे. पण बीचवर तिने घातलेल्या कपड्यांची चर्चा जास्तच होताना दिसत आहे. कमी किंवा अतरंगी कपड्यांमुळे ट्रोल होणाऱ्या उर्फीने यावेळी मात्र सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. उर्फीने तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यात तिने सूट आणि सलवार घातलेला दिसत आहे.

आणखी वाचा- उर्फी जावेदच्या अडचणीत वाढ, मुंबई पोलिसांकडे अभिनेत्रीच्या विरोधात तक्रार

उर्फी जावेदने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये ती बीचवर उभी असलेली दिसत आहे. तिने सलवार-सूट आणि ओढणीही परिधान केली आहे. ग्रे आणि पर्पल कलरच्या प्रिंटेड ड्रेसमध्ये ती पंजाबी मुलगी दिसत आहे. या लूकसह तिने केस मोकळे सोडले आहेत. या लूकमध्ये उर्फी खूपच सुंदर दिसत आहे. उर्फी जावेदच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत.

आणखी वाचा- Video : उर्फी जावेद चक्क साडी नेसून पोहोचली विमानतळावर, वाऱ्यामुळे पदर सरकला अन्…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उर्फी जावेदचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला असून त्यावर कमेंट करताना एका युजरने लिहिलं, “जिथे सलवार सूट घालायला हवा तिथेच जर तू असे कपडे घालशील तर बरं होईल.” दुसऱ्या एकाने लिहिलं, “आज सूर्य नेमका कुठून उगवला आहे. मी स्वप्नात तर नाही ना. हे खरं आहे का?” तर आणखी एका युजरने लिहिलं, “ती खूप क्यूट आहे आणि खूप मजेदारही.”