बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर ही नेहमीच काही ना कारणांमुळे चर्चेत असते. उर्मिलाने तिच्या मेहनतीच्या जोरावर उत्तम स्थान निर्माण केले आहे. तिने तिच्या कारकिर्दीत बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक चित्रपटात काम केले आहे. त्याचप्रमाणे ‘माधुरी, ‘आजोबा’ अशा मराठी चित्रोटांमध्येही ती झळकली. आता पुन्हा एकदा एका मराठी चित्रपटाच्या माध्यमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आणखी वाचा : आठ वर्षांनी मृणाल कुलकर्णी पुन्हा एकदा दिग्दर्शिकेच्या भूमिकेत, महिला विशेष चित्रपटात झळकणार ‘हे’ कलाकार

ti-mi-navhech

परितोष पेंटर यांच्या लेखनीतून उतरलेल्या ‘ती मी नव्हेच’ या चित्रपटात उर्मिला महत्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. तसेच या चित्रपटात तिच्याबरोबर श्रेयस तळपदे, निनिद कामत या कलाकारांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटामुळे हिंदी कलाविश्व गाजवणारे हे तीन कलाकार प्रथमच मराठीमध्ये एकत्र काम करताना दिसणार आहेत. या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे. पण हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याची अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही.

urmila

हेही वाचा : “लिटील प्रिन्सेस, तुझ्या येण्याने…” उर्मिला मातोंडकरच्या नवऱ्याच्या पोस्टने वेधलं लक्ष

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एका मोठ्या कालावधीनंतर मराठीमध्ये पुनरागमन करणाऱ्या उर्मिला मातोंडकरने आपलं मनोगत व्यक्त करताना सांगितलं की, “चित्रपटाची कथा ऐकताच क्षणी मला भावली. यासाठी मी पारितोषला नकार देऊच शकले नसते. ‘ती मी नव्हेच’च्या माध्यमातून पारितोष सोबत काम करण्याचा आनंद तर आहेच शिवाय मराठी चित्रपटाद्वारे आणि श्रेयस तळपदे सारख्या सहकलाकारासोबत काम करायला मिळत असल्याने हा आनंद द्विगुणीत झाला आहे.”