Urvashi Rautela Claims Theft Of Jewellery Worth Rs 70 Lakh From London Airport : बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीने गुरुवारी (३१ जुलै) इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. मुंबईहून विम्बल्डनला जाताना लंडनच्या गॅटविक विमानतळावर तिची आलिशान हँडबॅग चोरीला गेल्याचा दावा अभिनेत्रीने केला आहे.

याबरोबरच तिने तिच्या फ्लाइटची माहितीही शेअर केली आहे आणि अधिकाऱ्यांना आवश्यक ती कारवाई करण्याची मागणी केली आहे. आम्ही बोलत आहोत उर्वशी रौतेलाबद्दल.

सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट

उर्वशीने गुरुवारी तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर एका महागड्या बॅगचा फोटो, तिकिटाची माहिती आणि इतर महत्त्वाची माहिती शेअर केली. तिने सांगितले की ती एमिरेट्स एअरलाइन्सने प्रवास करत होती. पोस्ट शेअर करत ती म्हणाली, “माझी बॅग चोरीला गेली आहे. या बॅगमध्ये हिरेजडित अंगठी, महागडं घड्याळ, आयपॅड, काही रोख रक्कम आणि इतर मौल्यवान वस्तू होत्या. मी खूप अस्वस्थ आणि निराश आहे. कृपया मला मदत करा.” विमानतळावरील CCTV फुटेज तपासले जात असून सुरक्षा यंत्रणा बॅग शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

विमानतळावर पोहोचल्यानंतर तिचं सामान मिळत नसल्याचं लक्षात आलं. उर्वशीच्या सांगण्यानुसार, या बॅगेत तब्बल ७० लाख रुपयांचे दागिने, मोठ्या ब्रँडचे कपडे, महागडं घड्याळ, अ‍ॅपल आयपॅड, क्रेडिट कार्ड्स, रोख रक्कम आणि इतर मौल्यवान वस्तू होत्या.

१३ जुलै रोजी उर्वशी विम्बल्डनमध्ये दिसली होती. या मोठ्या क्रीडा स्पर्धेत तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. तिने एक सुंदर पांढरा ड्रेस घातला होता, परंतु तिच्या बॅगेने लोकांचे लक्ष वेधून घेतले.

View this post on Instagram

A post shared by URVASHI RAUTELA (@urvashirautela)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ती स्टेडियममध्ये तपकिरी रंगाची हर्मीस हँडबॅग घेऊन बसली होती, ज्यामध्ये चार लाबुबू डॉल लटकत होत्या. काही लोकांनी असेही सांगितले की तिच्याकडे असलेले लाबुबू फेक आहेत. कामाच्या बाबतीत बोलायचे झाले, तर उर्वशी शेवटची ‘जाट’ आणि ‘डाकू महाराज’ या चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट २०२५ च्या पहिल्या सहामाहीत प्रदर्शित झाला होता. डाकू महाराजमधील तिचे ‘दाबिडी दिबिडी’ हे गाणे खूप व्हायरल झाले होते.

चित्रपटाने चांगला व्यवसाय केला. ‘डाकू महाराज’ १२ जानेवारी २०२५ रोजी संक्रांतीच्या दिवशी जगभरात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने जगभरात १३०-१५० कोटींपेक्षा जास्त कमाई केली. हा २०२५ मधील सर्वाधिक कमाई करणारा चौथा तेलुगू चित्रपट आहे.