बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडल उर्वशी रौतेला तिच्या सौदर्याने आणि अदाकारीने चाहत्यांची मनं जिंकताना दिसते. उर्वशी सोशल मीडियावर सक्रिय असून बोल्ड फोटो आणि व्हिडीओ ती चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते.
नुकताच उर्वशीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओत उर्वशी खूप सुंदर दिसतेय. सो प्रिटी या गाण्यावर उर्वशीची अदाकारी या व्हिडीओत पाहायला मिळतेय. या व्हिडीओला उर्वशीच्या चाहत्यांनी तुफान लाईकस् दिले आहेत. तर व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये उर्वशीने तिच्या आगामी अल्बमबद्दल सांगितलं आहे.” माझ्या इंटननॅशनल अल्बमसाठी Versace साठी उत्सुक आहात का?” असं कॅप्शन तिनं व्हिडीओला दिलंय.
View this post on Instagram
उर्वशी रौतेला लवकच ‘ब्लॅक रोज’ या तेलगू सिनेमात झळकणार आहे.’सिंह साब द ग्रेट’ या सिनेमातून उर्वशीने बॉलिवूडमध्ये एण्ट्री केली होती. त्याचसोबत ‘सनम रे’, ‘हेट स्टोरी’ या सिनेमांमधून उर्वशीची अभिनयाची झलक पाहायला मिळाली.