उर्वशी रौतेला आणि ऋषभ पंत यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. दोघांदरम्यान रंगलेल्या इन्स्टा वॉरवरून सर्वांना त्यांच्यातील वादाची माहीती झाली. उर्वशीने एका मुलाखतीत एका व्यक्तीबद्दल सांगितलं होतं. आरपी नावाचा एक जण दिल्लीत तिच्या चित्रपटाचं शूटिंग सुरू असताना तिला भेटायला आला होता, असं तिने सांगितलं होतं. त्याचं नाव आरपी म्हटल्यानंतर तो ऋषभ पंत असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली होती. यानंतर यानंतर मात्र ऋषभ पंत आणि उर्वशी रौतेला यांच्या सोशल मीडियावर कोल्ड वॉर पाहायला मिळालं. पुढे उर्वशीने ऋषभची माफीही मागितली होती.

हेही वाचा – ऋषभ पंतसाठी भर रस्त्यात भांडल्या उर्वशी आणि ईशा नेगी? पाहा Viral Video

ऋषभची माफी मागितल्यानंतर मागच्या काही दिवसांपासून उर्वशीच्या पोस्ट लक्ष वेधून घेत आहेत. भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असतानाच उर्वशीने ती तिच्या मनाचं ऐकून ऑस्ट्रेलियात पोहोचल्याची पोस्ट केली होती. त्यानंतर तिने साडीतले फोटो शेअर करत शायरीचे कॅप्शन टाकले होते. त्यानंतर उर्वशीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून साडी नेसलेला एक फोटो शेअर केला होता. त्यात ती गळ्यात मंगळसूत्र आणि कुंकू लावून दिसत होती. या फोटोला तिने “प्रेम में पड़ी प्रेमिका को, सिन्दूर से प्रिय कुछ नहीं होता !! सारी रस्म रिवाज़ के साथ चाहिए, उम्रभर का साथ पिया तुमसे”, असं कॅप्शन दिलं होतं. गेले काही दिवस ती सातत्याने असे फोटो शेअर करत आहे आणि नेटकरी तिला ऋषभ पंतची आठवण आल्याचं म्हणत ट्रोल करत आहेत. अशातच तिने करवाचौथच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा – कुंकू, मंगळसूत्र घातलेला फोटो पोस्ट करत उर्वशी रौतेलाने पुन्हा वेधलं लक्ष, चाहते म्हणाले “वर्ल्ड कप झाल्यानंतर…”

उर्वशीने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती पांढऱ्या रंगाचं टॉप आणि लाल रंगाचं शॉर्ट स्कर्ट घालून दिसत आहे. “चंद्राचा प्रकाश तुमचं जीवन आनंद, शांतीने भरू देत. करवा चौथच्या शुभेच्छा..!!” असं कॅप्शन तिने दिलंय.

View this post on Instagram

A post shared by URVASHI RAUTELA (@urvashirautela)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावरून नेटकऱ्यांना पुन्हा एकदा ऋषभची आठवण झाली. ‘ही पोस्ट ऋषभ पंतसाठी आहे का’, असं एका युजरने म्हटलंय. ‘तू ऋषभसाठी व्रत करणारेस का’ असं एका नेटकऱ्यांने विचारलं. तर दुसऱ्या एका युजरने ‘तू आज शायरी का नाही टाकलीस’, अशी विचारणा केलीय. काहींनी तिला गप्प बसण्याचा आणि ऋषभला क्रिकेटवर लक्ष केंद्रित करू देण्याचा सल्ला दिलाय.