आज १४ फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाईन डे. आजचा दिवस हा प्रेमाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. आजच्या दिवशी लोक आपल्या साथीदारासोबत घालवतात आणि प्रेम व्यक्त करतात. याच निमित्ताने बॉलिवूड सेलिब्रिटी त्यांच्या पार्टनरसाठी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना दिसतात. यासोबतचं त्यांच्या रिलेशनशिपविषयी आणखी बऱ्याच गोष्टी शेअर करताना दिसतात. दरम्यान, या सगळ्यात बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरने त्याच्या आणि मलायकाच्या रिलेशनशिपविषयी अनेक खुलासे केले आहेत.

मलायका आणि अर्जुन बऱ्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. अर्जुनने व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने ‘हिंदुस्तान टाइम्स’ला मुलाखत दिली. यावेळी त्याने मलायकासोबत असलेल्या त्याच्या रिलेशनशिपविषयी अनेक गोष्टी सांगितल्या. यावेळी अर्जुनने पहिल्यांदा जेव्हा त्याने सोशल मीडियावर मलायकासोबत फोटो शेअर करताना त्याची रिअॅक्शन कशी होती ते सांगितलं आहे.

आणखी वाचा : रितेश देशमुखचा ‘नाच’ पाहून जिनिलिया संतापली, मजेदार Video Viral

अर्जुनने जेव्हा सोशल मीडियावर पहिल्यांदा मलायकासोबत फोटो शेअर केला तर त्यावर आधी त्या दोघांची चर्चा केली होती का? यावर अर्जुन म्हणाला की, या सगळ्या गोष्टींवर त्या दोघांनी काही प्लॅन नव्हता केला. ‘आमच्या रिलेशनशिपबद्दल सगळ्यांना सांगण्याचा निर्णय आम्ही घेतला नव्हता. या विषयी तर आम्ही चर्चा देखील केली नव्हती.”

आणखी वाचा : राजेश खन्नासोबत ब्रेकअपनंतर अंबानींच्या सुनेला B-Grade चित्रपटात करावे लागले होते काम!

अर्जुन पुढे म्हणाला, “आम्हाला माहित होते की हे कधीतरी आम्हाला सांगावे लागणार. मला असे वाटते की आपल्या सर्वांच्या जीवनात एक अशी वेळ येते, जिथे आपण या सगळ्याचा काय परिणाम होईल याचा विचार करण बंद करतो. काही वेळा गोष्टी वेळेनुसार होतात. जेव्हा आम्हाला असे वाटले की आम्ही सगळ्यांना आमच्या रिलेशनशिपविषयी सांगू शकतो तेव्हा आम्ही या विषयी सांगितले.”