सिनेसृष्टीपासून दुरावलेले किंवा इंडस्ट्रीत संघर्ष करत असलेले अनेक कलाकार प्रसिद्धीसाठी ‘बिग बॉस’मध्ये सहभागी होतात. आता ‘बिग बॉस’ हा शो फक्त हिंदी भाषेपुरता मर्यादित राहिलेला नाही तर मराठी, कन्नड, तमिळ, मल्याळ भाषांमध्ये हा शो होतो. आज आम्ही तुम्हाला ‘बिग बॉस तमिळ 4’मधील एका अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत. या शोपूर्वी फार कमी लोक तिला ओळखत होते, पण शो नंतर तिच्या फॅन फॉलोइंगमध्ये प्रचंड वाढ झाली.

या अभिनेत्रीचं नाव संयुक्ता. सध्या तिच्या दुसऱ्या लग्नाच्या चर्चा रंगल्या आहे. विशेष म्हणजे संयुक्ता कथितरित्या सीएसकेच्या माजी खेळाडूबरोबर दुसरं लग्न करणार असल्याचं म्हटलं जातंय. ‘बिग बॉस तमिळ’च्या सीझन ४ मधील स्पर्धक संयुक्ता ही आधी मॉडेलिंग इंडस्ट्रीत कार्यरत होती. संयुक्ताने २००७ मध्ये ‘मिस चेन्नई’चा किताब जिंकला होता. ‘बिग बॉस’मुळे मिळालेल्या प्रसिद्धीने तिला चित्रपटसृष्टीत ओळख मिळवण्यात मदत केली. त्यानंतर तिने विजयच्या ‘वारिसु’ या चित्रपटात काम केलं.

संयुक्ताने ‘कॉफी विथ लव्ह’, ‘तुघलक दरबार’ आणि ‘माय डिअर भूतम’ सारख्या चित्रपटांमध्येही काम केलं आहे. तिचं लग्न कार्तिक नावाच्या व्यक्तीशी झालं होतं आणि त्यांना एक मुलगाही आहे. काही दिवसांसाठी कार्तिक दुबईला गेला आणि नंतर तो परत आला नाही. त्यामुळे दोघांनी मतभेदांमुळे घटस्फोट घेतला आहे, अशा बातम्या आल्या.

अभिनेत्री संयुक्ता सध्या आपल्या मुलाबरोबर एकटीच राहतेय. ती आता दुसऱ्या लग्नाची तयारी करत आहे, अशा चर्चा रंगल्या आहेत. संयुक्ता चेन्नई सुपर किंग्सचा माजी खेळाडू आणि क्रिकेट समालोचक अनिरुद्ध श्रीकांतशी लग्न करणार असं म्हटलं जातंय.

नुकताच तिने दिवाळीच्या निमित्ताने अनिरुद्ध श्रीकांतबरोबरचा एक फोटो पोस्ट केला होता. अफेअरबद्दल विचारल्यावर संयुक्ता म्हणाली, “सगळं काही इंटरनेटवरच आहे. जे काही आहे ते इंटरनेटवर आहे.” ती लवकरच अनिरुद्ध श्रीकांतशी विवाहबंधनात अडकणार आहे, असं म्हटलं जातंय.

अनिरुद्ध श्रीकांत हे माजी क्रिकेटपटू कृष्णमाचारी श्रीकांत यांचे चिरंजीव आहेत. अनिरुद्ध चेन्नई सुपर किंग्ससाठी काही सीझन खेळले होते. सध्या ते क्रिकेट समालोचक आहेत. अनिरुद्धने २०१२ मध्ये आरती वेंकटेशशी लग्न केलं होतं, पण काही वर्षांपूर्वी त्यांचा घटस्फोट झाला आणि ते वेगळे झाले.