झी टीव्हीवरील डान्स रिअॅलिटी शो ‘डीआयडी सुपर मॉम्स सीझन ३’चा ग्रँड फिनाले रविवारी पार पडला. वर्षा बुमरा ही स्पर्धक यंदाच्या पर्वाची विजेती ठरली आहे. वर्षाने ट्रॉफी आणि ५ लाख रुपयांची बक्षीस रक्कम जिंकली. याशिवाय प्रायोजकांनी तिला अतिरिक्त २.५ लाख रुपयांचा चेकही दिला. वर्षासह अनिला रंजन, अल्पना पांडे, रिद्धी तिवारी, साधना मिश्रा आणि सादिका खान यांचा फायनलिस्टमध्ये समावेश होता. डीआयडी सुपर मॉम्समध्ये भाग्यश्री, उर्मिला मातोंडकर आणि रेमो डिसूझा जज होते.

वर्षा मूळची हरियाणाची असून ती एका बांधकामाच्या ठिकाणी रोजंदारी मजूर म्हणून काम करायची. तिला आधीपासून नृत्याची आवड होती, लग्नापूर्वी ती अनेक स्पर्धांमध्ये भाग घ्यायची. तिला पाच वर्षांचा मुलगा आहे. आपल्या मुलाचं भविष्य घडवण्यासाठी तिने डीआयडीमध्ये येण्याचा निर्णय घेतला होता. “जी महिला अशा शोच्या सुरक्षा रक्षकाशी बोलू शकेल, अशा परिस्थितीत नव्हती, तिने आज हा शो जिंकलाय. माझ्या मुलाचं आयुष्य चांगलं असावं, हीच माझी एकमेव प्रेरणा होती. आणि मला विश्वास आहे की यानंतर आमचं आयुष्य आधीपेक्षा चांगलं असेल. मला नृत्याच्या क्षेत्रातच काहीतरी करायचंय,” असं ती इंडियन एक्सप्रेसशी बोलताना म्हणाली.

आर. बाल्की यांना अशी सुचली होती ‘चूप’ची कथा, दिग्दर्शकाने सांगितला भन्नाट किस्सा

दरम्यान, वर्षा डीआयडी सुपर मॉम्समध्ये आली, त्यावेळई तिच्यावर कर्ज होतं. जज रेमो डिसूझा ते कर्ज फेडण्यासाठी पुढे आले होते, तर एकदा प्रमुख पाहुणा म्हणून आलेल्या मिका सिंगने वर्षाच्या मुलाच्या शिक्षणाचा खर्च उचलणार असल्याचं म्हटलं होतं. शोमध्ये मिळालेली ही सर्वात मोठी भेट असल्याचे सांगून वर्षा म्हणाली, “आमचं उत्पन्न आम्हाला जगण्यासाठी पुरेसं नव्हतं आणि त्यामुळे आम्ही खूप कर्ज घेतले आहे. लोक पाठिंबा देत असताना, एक असा होता जो आम्हाला कर्ज परतफेड करण्यासाठी धमकी देत होता. मी एवढ्या मोठ्या शोमध्ये आहे, चांगले कपडे घातले आहे, त्यामुळे माझ्याकडे पैसे असतीलच, असं त्याचं म्हणणं होतं”.

तुषार कालिया ठरला ‘खतरों के खिलाडी १२’चा विजेता, ट्रॉफी अन् कारसह जिंकली ‘एवढी’ रोख रक्कम

दरम्यान, वर्षाने शो जिंकल्यानंतर तिच्या पतीचे आभार मानले. “दिवसभर काम करून आम्ही परत यायचो, तेव्हाही तो मला सराव करण्यास प्रोत्साहित करायचा, जेणेकरून मी स्वतःला सुधारू शकेन. त्याच्या प्रोत्साहन आणि प्रेमामुळे मी इथे पोहोचू शकले,” असं वर्षाने सांगितलं.