Ved Movie Fame Actress Shares Post About Doctors : कलाविश्वातील अनेक कलाकार मंडळी ही सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतात. सोशल मीडियाद्वारे ते आपले फोटो व व्हिडीओ शेअर करीत असतात. तसंच ते कामाबद्दलच्या अपडेट्सही शेअर करताना दिसतात. तसंच काही कलाकारांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अनुभव, प्रसंग किंवा एखादी घटनासुद्धा चाहत्यांबरोबर शेअर करावीशी वाटते. अशातच एका अभिनेत्रीने पोस्टद्वारे तिचा अनुभव शेअर केला आहे.
जिया शंकर या अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे आणि या पोस्टमधून तिने नरकासमान अनुभव घेतला असल्याचं म्हटलं आहे. जिया सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. सोशल मीडियाद्वारे ती तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहते. सोशल मीडियावर जिया तिचे विविध लूक्समधील ग्लॅमरस फोटो शेअर करते. अशातच जियाची इन्स्टाग्राम स्टोरी लक्ष वेधून घेत आहे.
या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे जिया म्हणते, “भारत/मुंबईतल्या डॉक्टरांचं काय चाललंय? माफ करा. पण हे सगळं बोलावंसं वाटतंय. कारण- मी सतत नरकासमान अनुभव घेतला आहे. लोकांच्या आरोग्याशी खेळणं थांबवा. आधी नीट शिक्षण घ्या, प्रॅक्टिस करा आणि मग तुमचं फॅन्सी क्लिनिक सुरू करा किंवा एखाद्या प्रतिष्ठित हॉस्पिटलमध्ये नोकरी करा.”
त्यानंतर जियानं, “डॉक्टरांबद्दल आदर आहे; पण त्यांच्यावर विश्वास ठेवला हीच चूक झाली,” असंही म्हटलं आहे. दरम्यान, अभिनेत्रीनं ही पोस्ट नक्की कशा संदर्भात केली आहे. त्याबद्दल काही माहिती दिलेली नाही. मात्र, या पोस्टद्वारे तिचा त्रास आणि खदखद दिसून येत आहे.
जिया शंकरने शेअर केलेली इन्स्टाग्राम स्टोरी

जिया ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. ती रितेश देशमुखच्या ‘वेड’ या चित्रपटात पाहायला मिळाली होती. या सिनेमातील तिची आणि रितेशची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडली होती. ‘वेड’ चित्रपटापूर्वी जियानं साऊथ चित्रपटांमध्येही काम केलं आहे. मॉडेल म्हणून करिअरची सुरुवात करणाऱ्या जियाला ‘मेरी हानिकारक बीवी’ या मालिकेतून विशेष ओळख मिळाली.
तसंच तिनं ‘बिग बॉस’ ओटीटीच्या दुसऱ्या सीझनमध्येही सहभाग घेतला होता. सोनी सबवरील ‘गुड नाईट इंडिया’ या शोची ती सह-सूत्रसंचालिकासुद्धा होती. आपल्या अभिनय आणि स्टायलिश अंदाजामुळे जिया सोशल मीडियावर कायमच चर्चेत असते. अशातच तिनं शेअर केलेल्या इन्स्टाग्राम स्टोरीमुळे ती चर्चेत आली आहे.