मराठी चित्रपट व नाट्यसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा आज ७५ वा वाढदिवस आहे. अशोक सराफ यांनी यंदा वयाची पंचाहत्तरी पूर्ण केली असून त्यांच्या चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीला पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत. विनोदी भूमिका साकारत आपल्या लाजवाब टायमिंगने प्रेक्षकांना खळखळून हसविणारे अभिनेते म्हणून अशोक सराफ यांना ओळखले जाते. त्यांच्या वाढदिवसानिमित्त किचन कल्लाकारच्या टीमने त्यांना विशेष आमंत्रण दिले होते. त्यावेळी या टीमने त्यांच्या ५० वर्षांच्या सिनेसृष्टीच्या कारकिर्दीचाही आढावा घेतला. यावेळी त्यांचे औक्षणही करण्यात आले.

किचन कल्लाकारच्या मंचावर अशोक मामांचे औक्षण करण्यात आले. यावेळी अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने अशोक मामांच्या कारकिर्दीचा आढावा घेतला. त्यानिमित्ताने त्यांनी एक पत्र वाचून दाखवले. पांडू हवालदार चित्रपटातील सखाराम हवालदार, अशी ही बनवाबनवी मधील धनंजय माने, धुमधडाकामधील अशोक आणि यदुनाथ जवळकर अशा अनेक गाजलेल्या भूमिकांचीही आठवण या पत्रातून करण्यात आली. यावेळी अशोक सराफ भावूक झाले. “माझा वाढदिवस अशाप्रकारे कधी साजरा होईल, याची मी कल्पनाही केली नव्हती”, असेही त्यांनी म्हटले.

‘देवमाणूस २’ मालिकेत येणार नवा ट्विस्ट, जामकरमुळे डॉ. अजितकुमार सापडणार अडचणीत

अशोक सराफ यांनी या निमित्ताने एक इच्छाही व्यक्त केली. “माझ्या या भूमिकांचे रसिक प्रेक्षकांनी नेहमीच कौतुक केले आहे. त्यांच्यामुळे मी इथपर्यंत पोहोचलो आहे. या भूमिकांमुळे मला एक वेगळी ओळख मिळाली आहे. मला ही नाव द्या, पण फक्त कोणीही नाव ठेऊ नका”, असे त्यांनी म्हटले.

‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेतून एक्झिट घेण्याबाबत उर्मिला कोठारेचे स्पष्टीकरण, म्हणाली “एका महिन्यानंतर…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान अशोक सराफ यांनी आजवर अनेक मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये काम करत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. ‘विनोदाचा सम्राट’ म्हणून ओळखले जाणारे अशोक सराफ प्रेक्षकांचे लाडके अभिनेते आहेत. आजवर त्यांनी विविध भूमिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केले. वयाच्या ७५ व्या वर्षीसुद्धा ते प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत.