Actress Sheela on Hema Committee Report: मल्याळम सिनेसृष्टीत (Malayalam Cinema) हेमा कमिटीच्या अहवालानंतर खळबळ उडाली आहे. ज्येष्ठ मल्याळम अभिनेत्री शीला यांनी इंडस्ट्रीमध्ये लैंगिक छळाचा सामना करणाऱ्या महिलांना पाठिंबा दिला. या पीडितांना लैंगिक छळाचे पुरावे मागणाऱ्यांना शीला यांनी प्रश्न विचारला आहे. महिलांनी लैंगिक शोषणासारख्या घृणास्पद गोष्टी घडत असताना पुरावे म्हणून गुन्हेगारांबरोबर फोटो काढायचे का? असं त्यांनी विचारलं.

शीला मातृभूमीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाल्या, “पोलीस आणि न्यायालये पुरावे मागतात. कोणीतरी अचानक येऊन आपल्याला मिठी मारतं किंवा किस करतं तेव्हा आपण फोटो किंवा सेल्फी काढू शकतो का? किंवा ‘मला फोटो काढू द्या’ असं पीडितांनी म्हणणं अपेक्षित आहे का? जुन्या काळी फक्त लँडलाईन फोन होते आणि काहीही रेकॉर्ड करण्याचे पर्याय नव्हते, त्यावेळी भविष्यात कधीतरी हेमा कमिटीची स्थापना होईल याचा अंदाज या पीडितांना असेल का? अशा परिस्थितींचा अंदाज बांधता येत नाही. त्यामुळे अशा गैरवर्तनाच्या प्रकरणांसाठी पुरावा कसा दिला जाऊ शकतो?”

“अभिनेत्रींचे नग्न व्हिडीओ रेकॉर्ड करतात,” ज्येष्ठ अभिनेत्रीचा मोठा दावा; म्हणाल्या, “माझ्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये…”

या महिलांना पाहून वाईट वाटतं- शीला

‘मनोरमा ऑनलाइन’ला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या शीला यांनी सिनेइंडस्ट्रीत महिलांना भेडसावणाऱ्या आव्हानांबद्दल सांगितलं. “मला माहीत आहे की, चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी महिलांना किती संघर्ष करावा लागतो. काही आर्थिक कारणांमुळे चित्रपटसृष्टीत येतात, तर काहींना त्यांच्या कलेबद्दलच्या प्रेमामुळे इथे येतात, पण त्यांना अशा रितीने संघर्ष करताना पाहून खूप वाईट वाटतं,” असं त्या म्हणाल्या.

१०व्या वर्षांची असताना सेटवर लैंगिक अत्याचार झाला; दिग्गज अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली, “माझ्या आईने जाब विचारल्यावर त्यांनी…”

महिलांना त्रास देणारे पुरुष खूप जास्त

इंडस्ट्रीमध्ये फक्त मोजक्याच पुरुषांवर आरोप झाले आहेत, इंडस्ट्रीत महिलांना त्रास देणारे पुरुष खूप जास्त आहेत, पण त्यांच्याबद्दल कोणी बोलत नाही, असा दावा त्यांनी केला. “तेव्हा, उघडपणे बोलण्याची संधी मिळायची नाही आणि तशी परिस्थितीही नव्हती. इतके सगळे लोक अशा प्रकरणांमध्ये सहभागी असताना फक्त मोजक्याच कलाकारांची नावं का घेतली जात आहेत हे मला समजत नाही. जर कोणी दोषी असेल तर त्यांना शिक्षा झाली पाहिजे,” असं त्या म्हणाल्या.

Photos: ३ वर्षांच्या अफेअरनंतर बॉलीवूड अभिनेत्रीशी केलं ब्रेकअप, आता तिच्याच मैत्रिणीशी करीनाच्या भावाने केला साखरपुडा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शीला यांची ही प्रतिक्रिया जस्टिस हेमा कमिटीच्या अहवालाच्या पार्श्वभूमीवर आली आहेत. हेमा कमिटीच्या २३५ पानांच्या अहवालात मल्याळम इंडस्ट्रीतील महिलांनी अनेक अभिनेत्यांवर आणि दिग्दर्शकांवर लैंगिक अत्याचाराचे गंभीर आरोप केले आहेत. ऑगस्ट महिन्यात महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप झाल्यानंतर असोसिएशन ऑफ मल्याळम मूव्ही आर्टिस्ट्सच्या (AMMA) संपूर्ण समितीने राजीनामा दिला होता.