जस्टिस हेमा कमिटीच्या अहवालानंतर मल्याळम सिनेइंडस्ट्रीत खळबळ उडाली आहे. अभिनेते व आमदार मुकेश यांच्यासह काही जणांवर लैंगिक शोषणाचे आरोप झाले आहेत. त्यानंतर आता दिग्गज तमिळ अभिनेत्री कुट्टी पद्मिनी (Tamil Actress Kutty Padmini) हिने धक्कादायक खुलासा केला आहे. ती फक्त १० वर्षांची असताना तिचे लैंगिक शोषण झाले होते.

अभिनेत्री कुट्टी पद्मिनी मी टू मोहिमेदरम्यान २०१९ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या साऊथ इंडियन आर्टिस्ट असोसिएशनच्या (SIAA) अंतर्गत तक्रार समितीच्या सदस्यांपैकी एक होती. सिनेइंडस्ट्रीतील लैंगिक शोषणाविरूद्धच्या जी कारवाई करण्याचे आश्वासन दिले जातेय त्यातून काहीच निष्पन्न होणार नाही, त्यासाठी योग्य कायदे असणं गरजेचं आहे, असं ती शुक्रवारी म्हणाली.

“गरोदर असताना त्याने पोटावर लाथ मारली”, लैंगिक शोषणाचे आरोप झालेल्या अभिनेत्याबद्दल पहिल्या पत्नीने केलेले धक्कादायक खुलासे

मुलींना तमिळ इंडस्ट्रीपासून ठेवलं दूर

“खरं तर परिस्थिती इतकी वाईट आहे की मी माझ्या तीन मुलींना तमिळ चित्रपट उद्योगात येऊच दिलं नाही,” असं तिने पीटीआयला सांगितलं. पद्मिनीने ती तीन महिन्यांची असताना अभिनयक्षेत्रातील करिअरला सुरुवात केली होती. तिने कुळनदाइयुम देइवामुम (१९६५) या चित्रपटातील अभिनयासाठी बाल कलाकाराचा राष्ट्रीय पुरस्कार जिंकला होता. “मी फक्त १० वर्षांची असताना सेटवर माझ्यावर लैंगिक अत्याचार झाला होता. मी माझ्या आईला याबद्दल सांगितलं आणि माझ्या आईने निर्मात्यांना याबाबत जाब विचारल्यावर त्यांनी मला चित्रपटातून काढलं,” असं पद्मिनीने सांगितलं.

सेटवरचं प्रेम, वयात १४ वर्षांचे अंतर अन् कडाक्याची भांडणं; अभिनेता म्हणाला, “एका क्षणी मला वाटलं…”

महिला बऱ्याच वर्षांनी बोलत आहेत म्हणून…

एसआयएएच्या १० सदस्यीय समितीबद्दल विचारलं असता पद्मिनी म्हणाली, या समितीने काहीही केलेलं नाही. तमिळ इंडस्ट्रीतील गायिका चिन्मयी व अभिनेत्री श्री रेड्डीने अत्याचारांविरोधात आवाज उठवला, पण त्यांना बाजूला सारण्यात आलं. “इंडस्ट्रीमधील महिलांबद्दल बोलायचं झाल्यास रेवती, रोहिणी तसंच सुहाशिनीही होत्या. पण त्या काळात एकही बैठकदेखील झाली नाही. कोणीही बोलायला पुढे आलं नाही. सत्य आहे, पण त्याचा कोणताही पुरावा नाही, कारण महिला बऱ्याच वर्षांनंतर त्याबद्दल बोलत आहेत, त्यामुळे ते खोटं आहे म्हणून फेटाळणं खूप सोपं आहे. लहान मुलांचे शोषण करणे हा एक गंभीर गुन्हा आहे, पण त्या आरोपींना कोणतीच शिक्षा झाली नाही. नेहमी असंच होतं,” असं पद्मिनी म्हणाली.

२० सिनेमे फ्लॉप, १३ वर्षे चित्रपटांपासून दूर; बॉलीवूड अभिनेता तरीही कमावतो बक्कळ पैसे, करतो ‘हे’ काम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अभिनेता विशाल काय म्हणाला?

गुरुवारी अभिनेता विशालने माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्याला जस्टिस हेमा कमिटीच्या अहवालाबद्दल विचारण्यात आलं. त्यावर येत्या १० दिवसांत १० सदस्यीय समिती स्थापन करण्याचे आश्वासन त्याने दिले होते. “इंडस्ट्रीतील महिलांच्या समस्या ऐकणं आणि त्या सोडवणं हे नादिगर संगमचे कर्तव्य आहे. नादिगर संगम फक्त पुरुषांसाठी नाही, या चित्रपटसृष्टीत महिलांचीही महत्त्वाची भूमिका आहे,” असं विशाल म्हणाला.