विकी कौशलला एक्स गर्लफ्रेंडनं नाव न घेता मारला टोमणा, म्हणाली... | vicky kaushal ex girlfriend harleen sethi post goes viral users says now move on | Loksatta

विकी कौशलला एक्स गर्लफ्रेंडनं नाव न घेता मारला टोमणा, म्हणाली…

हरलीन सेठीची इन्स्टाग्राम पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

विकी कौशलला एक्स गर्लफ्रेंडनं नाव न घेता मारला टोमणा, म्हणाली…
नात्याची जाहीर कबुली दिल्यानंतर काही दिवसांत विकी कौशलनं हरलीनशी ब्रेकअप केलं होतं.

बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आज आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये गणला जातो. अर्थात अभिनयाची कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसतानाही विकीनं या क्षेत्रात बरंच यश मिळावलं आहे. आपल्या चित्रपटांसोबतच विकी कौशल अनेकदा त्याच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत राहिला आहे. आता विकी कौशल पत्नी कतरिनासोबत आपलं वैवाहीक जीवन एन्जॉय करत आहे. पण तिच्या आधी तो अभिनेत्री हरलीन सेठीला डेट करत होता. आपल्या बिनधास्त स्वभावासाठी ओळखली जाणारी हरलीन तिच्या ‘ब्रोकन बट ब्युटीफुल’ या वेब सीरिजमुळे प्रसिद्ध आहे. आपल्या नात्याची जाहीर कबुली दिल्यानंतर काही दिवसांत विकी कौशलनं हरलीनशी ब्रेकअप केलं होतं. दोघंही एकमेकांच्या आयुष्यातून वेगळे झाले असले तरीही आता आपल्या एका इन्स्टाग्राम पोस्टमधून तिनं नाव न घेताच विकीला टोमणा मारला आहे.

विकी कौशल ज्यावेळी ‘मनमर्जिया’ (२०१८) चित्रपटाचं शूटिंग करत होता त्याचवेळी तो हरलीनला डेट करत होता. दोघांनी या नात्याची जाहीर कबुलीही दिली होती. पण त्यानंतर वर्षभरातच अचानक या दोघांच्या नात्यात दुरावा आला आणि ते वेगळे झाले. दोघांनीही या ब्रेकअपवर भाष्य करणं टाळलं. पण यासाठी नेहमीच कतरिना कैफला जबाबदार मानलं गेलं. कतरिनाशी विकीची जवळीक वाढल्यानं हरलीन आणि त्याच्या नात्यात दुरावा आल्याचं बोललं जातं.

आणखी वाचा- मृण्मयी देशपांडेनं हटके अंदाजात सिद्धार्थला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, फोटो एकदा पाहाच

ब्रेकअपनंतर कोणतीही प्रतिक्रिया देणं टाळणाऱ्या हरलीन सेठीनं तिच्या इन्स्टाग्रामावर एक फोटो शेअर केला आहे आणि या फोटोला तिनं एक मजेदार कॅप्शन देखील दिलं आहे. तिने लिहिलं, ‘माझ्या बॉयफ्रेंडच्या तुलनेत रस्ता जास्त खोल आहे. आउटफिट्स : बॉयफ्रेंडचा ट्रॅकसूट’ हरलीनच्या या पोस्टनंतर अनेकांनी तिच्या या फोटोवर कमेंट केल्या आहेत. काही युजर्सनी तिच्या फोटोवर कमेंट करत तिला मूव्ह ऑन होण्याचा सल्ला दिला आहे. एका युजरनं लिहिलं, ‘आता तू तुझ्या आयुष्यात पुढे जायला हवं.’ तर दुसऱ्या एका युजरनं लिहिलं, ‘इंडियन अँबर हर्ड.’

आणखी वाचा- 21 Years of Lagaan : शूटिंगच्या वेळी सलग ६ महिने सुरू होता गायत्री मंत्र, अन् आमिर खानने अचानक…

विकी कौशलच्या कामाबद्दल बोलायचं तर त्याच्याकडे या वर्षात बरेच प्रोजेक्ट आहे. त्याच्या आगामी चित्रपटांच्या यादीत ‘गोविंदा नाम मेरा’, ‘सॅम बहादुर’, ‘द इम्मॉर्टल अश्वत्थामा’ आणि ‘लुका छुपी २’ या चित्रपटांचा समावेश आहे. याशिवाय तो सध्या अभिनेत्री तृप्ती डिमरीसोबत ‘बुलबुल’ चित्रपटाचं शूटिंग क्रोएशियामध्ये करत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 14-06-2022 at 16:18 IST
Next Story
“माझी मुलं गे किंवा लेस्बियन असो फरक पडत नाही”, अभिनेत्रीचे वक्तव्य चर्चेत