बॉलिवूड अभिनेता विकी कौशलच्या फिटनेस आणि लूकचे असंख्य चाहते आहे. विकीनं फार कमी वेळात दमदार अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपलं स्थान पक्कं केलं आहे. सोशल मीडियावरही त्याचा मोठा चाहता वर्ग आहे. पण त्यातही तरुणींची संख्या जास्त आहे. आता विकी कौशलचं लग्न झालं असलं तरीही त्याच्या लूकवर अनेक तरुणी घायाळ होताना दिसतात. अशात सोशल मीडियावर विकी कौशलनं नुकत्याच शेअर केलेल्या फोटोवर एका तरुणीनं केलेल्या कमेंटची चर्चा होताना दिसत आहे.

विकी कौशलनं त्याच्या इन्स्टाग्रामवर नुकताच एक फोटो शेअर केला आहे. ज्यात तो ब्लॅक कलरच्या आउटफिट्समध्ये आपले बायसेप्स फ्लॉन्ट करताना दिसत आहे. विकी कौशलच्या या फोटोवर सध्या त्याच्या चाहत्यांच्या कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडताना दिसत आहे. अनेकांनी त्याच्या फिटनेसचं कौतुक केलं आहे. पण त्यासोबतच्या त्याच्या काही चाहत्यांनी त्याला ‘आता तुझं लग्न झालं आहे.’ अशी आठवणही करुन दिली आहे.

विकी कौशलच्या एका चाहतीनं त्याच्या फोटोवर कमेंट करताना लिहिलं, ‘तू अशाप्रकारचे फोटो सोशल मीडियावर शेअर करणं बंद कर, कारण आता सर्वांना माहीत आहे की तू विवाहित आहेस.’ विकीच्या चाहतीची ही कमेंट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. याशिवाय इतर अनेक चाहत्यांनी विकीच्या या फोटोवर कमेंट करत त्याच्या फिटनेसचं कौतुक केलं आहे. विकीच्या या फोटोला आतापर्यंत जवळपास ७ लाखांपेक्षा जास्त लोकांनी लाइक केलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विकी कौशलच्या कामाबद्दल बोलायचं तर तो अलिकडेच रिलीज झालेल्या ‘सरदार उधम’ या चित्रपटात दिसला होता. आगामी काळात त्याच्या ‘इमॉर्टल अश्वत्थामा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री सारा अली खान मुख्य भूमिकेत असणार आहे. सध्या विकी या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. याशिवाय त्याच्याकडे ‘सॅम बहादुर’ आणि ‘गोविंदा नाम मेरा’ हे दोन चित्रपट आहेत.