शेट्टी कुटुंबिय आज ‘बिग बॉस १५’ची स्पर्धक शमिता शेट्टीचा वाढदिवस साजरा करत आहेत. एका समुद्र किनारी असणाऱ्या हॉटेलमध्ये शमिताचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यावेळी तेथे शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा, शमिताचा बॉयफ्रेंड राकेश बापट आणि इतर काही स्टार्सने हजेरी लावली. त्यावेळी तेथे उपस्थित असणाऱ्या फोटोग्राफर्सला पोझ असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

बॉलिवूड सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शिल्पा शेट्टीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये शिल्पा हॉटेलबाहेर फोटोग्राफर्सला पोझ देताना दिसत आहे. त्यावेळी तिने सुंदर असा वनपिस परिधान केला आहे. या लूकमध्ये ती सुंदर दिसत आहे. पण फोटोग्राफर्सला पोझ देत असताना अचानक वारा येतो आणि शिल्पाचा ड्रेस उडू लागतो. शिल्पा कसाबसा तो ड्रेस सांभळते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हिडीओमध्ये शिल्पा बोलताना दिसत आहे की, ‘हवेचा पण काय टायमिंग आहे.’ त्यावर तेथील फोटोग्राफर ‘हवा हवाई’ असे बोलताना दिसतात. सध्या सोशल मीडियावर शिल्पाचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. अनेकांनी तिच्या या व्हिडीओवर कमेंट केल्या आहेत.