Vidhu Vinod Chopra asked Vidya Balan to get a nose job before Parineeta : विद्या बालनने शरतचंद्र चट्टोपाध्याय यांच्या क्लासिक बंगाली कादंबरीवर आधारित ‘परिणीता’ (२००५) या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये ब्लॉकबस्टर एन्ट्री केली. या चित्रपटात तिच्याबरोबर संजय दत्त आणि सैफ अली खान दिसले होते.
या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रदीप सरकार यांनी केले होते आणि निर्मिती विधू विनोद चोप्रा यांनी केली होती. ‘परिणीता’ या चित्रपटाने विद्याला रातोरात स्टार बनवले. विद्याने अलीकडेच एका मुलाखतीत खुलासा केला आहे की, विधू विनोद चोप्रा यांनी तिला या चित्रपटासाठी नाकाची शस्त्रक्रिया करून घेण्यास सांगितले होते.
“नाकाची शस्त्रक्रिया करण्यास सांगितले” : विद्या बालन
फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीदरम्यान विद्या म्हणाली, “विधू विनोद चोप्रा म्हणाले, ‘तुझे नाक लांब आहे. ते नीट कर. सर्जरी करून घे.’ पण मी नकार दिला. मी कधीही माझ्या चेहऱ्यात कोणतेही बदल केले नाहीत. मी फक्त अधूनमधून फेशियल केले आहे. मी जशी आहे, तशीच स्वतःवर विश्वास ठेवते.”
विद्या पुढे म्हणाली, ” ‘परिणीता’च्या यशानंतर अनेक मोठे दिग्दर्शक तिला भेटू लागले. पण, फोटोशूटदरम्यान ते म्हणायचे की, चल काहीतरी नवीन करून पाहूया. मी विचार करायचे की, जेव्हा तू मला अजून नीट पाहिलेही नाहीस, तेव्हा तू कोणती नवीन गोष्ट करून पाहशील? लोक मला तरुण आणि ग्लॅमरस दिसण्याबद्दल बोलत असत, जे काही काळानंतर तिला त्रास देऊ लागले. ते म्हणायचे, “चल तुला तरुण आणि सेक्सी बनवूया. मी प्रयोग करायला तयार होते; पण काही काळानंतर हे निराशाजनक झाले.”
‘परिणीता’ या चित्रपटातील विद्याच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. समीक्षक आणि प्रेक्षक दोघांनीही तिच्या अभिनयाचे कौतुक केले. या चित्रपटासाठी विद्याला सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. सैफ अली खानबरोबरची तिची केमिस्ट्रीखील खूप सुंदर आणि हृदयस्पर्शी होती.
‘परिणीता’ चित्रपटाच्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त पुन्हा एकदा थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. बुधवारी, पीव्हीआर आयनॉक्सने २० व्या वर्धापन दिनानिमित्त ‘परिणीता’ चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्याची घोषणा केली. हा रोमँटिक ड्रामा २९ ऑगस्ट रोजी भारतातील निवडक चित्रपटगृहांमध्ये एका आठवड्यासाठी पुन्हा प्रदर्शित केला जाईल.