बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे आणि विजय देवरकोंडा यांच्या ‘लायगर’ चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. अखेरीस हा चित्रपट आता प्रदर्शित झाला आहे. बॉयकॉट ट्रेंडमुळे चित्रपटाला फटका बसणार का? हा प्रश्न उपस्थित केला जात होता. प्रत्यक्षात मात्र असंच काहीसं घडताना दिसत आहे. अनन्याची या चित्रपटामधील भूमिका पाहून नेटकऱ्यांनी तिची खिल्ली उडवली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही फ्लॉप ठरला. या चित्रपटामुळे विजय देवरकोंडाला मात्र मोठा फटका बसला आहे.

विजय देवरकोंडाचा चाहतावर्ग फार मोठा आहे. ‘लायगर’ला मिळालेल्या अपयशामुळे त्याला मात्र नुकसान सहन करावं लागत आहे. हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, विजयचा आगामी चित्रपट ‘जन गण मन’चं काम आता पूर्णपणे बंद पडलं आहे. ‘लायगर’चे दिग्दर्शक जगन्नाथ पुरीचं या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार होते.
आणखी वाचा-अल्लू अर्जुनच्या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती; ‘या’ कारणामुळे होतंय सर्वत्र कौतुक

या चित्रपटाची घोषणा काही महिन्यांपूर्वीच करण्यात आली होती. इतकंच नव्हे तर २०२३मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र आता असं काहीच घडणार नसल्याचं समोर आलं आहे. देशभरात ‘लायगर’ने प्रदर्शनाच्या पहिल्या आठवड्यामध्ये फक्त ३५ कोटी रुपये कमाई केली. ही कमाई सुपरहिट चित्रपटांच्या तुलनेमध्ये फारच कमी होती. १०० कोटी रुपयांचा बजेट असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर पुरता अपयशी ठरला.

आणखी वाचा- “हिंदी चित्रपट करणं इंटरेस्टिंग गोष्ट आहे पण… ” विजय देवरकोंडाने केला होता खुलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चित्रपटाला मिळालेल्या अपयशामुळे निर्मात्यांना देखील आर्थिक नुकसान सहन करावं लागलं. म्हणूनच विजय नुकसान भरपाई म्हणून ‘लायगर’चे निर्माते चार्मी कौर आणि इतर सह निर्मात्यांना आपल्या कमाईमधील काही पैसे देणार आहे. ही रक्कम ६ कोटी रुपये असणार असल्याचं बोललं जात आहे. ‘जन गण मन’ चित्रपटाचं काम ठप्प झाल्यानंतर विजय समांथा प्रभुबरोबर नव्या तेलुगू चित्रपटात काम करताना दिसेल.