Vikram Gokhale Natsamrat Viral Video: रंगभूमीच्या सेवेत आयुष्य वेचलेले ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी आज पुण्यात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गेले काही दिवस विक्रम गोखले यांची प्रकृती नाजुक होती आणि पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. कालच ते उपचारांना प्रतिसाद देत आहेत हे वृत्तदेखील समोर आलं होतं, पण आज सकाळी त्यांच्या प्रकृती आणखी ढासळली. विक्रम गोखले यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर अनेक अनेकांनी श्रद्धांजली वाहिली आहे. अशातच अनेकांच्या स्टोरीज व स्टेटसमध्ये गोखलेंचा नटसम्राट चित्रपटातील एक खास व्हिडीओ पाहायला मिळत आहे.

नटसम्राट या चित्रपटासाठी विक्रम गोखले यांना त्यावर्षीचा मराठी फिल्मफेअर सोहळ्यातील सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते. नाना पाटेकर यांनी साकारलेल्या आप्पा बेलवलकर यांच्या जिगरी दोस्ताची भूमिका साकारताना गोखले यांनी अप्रतिम काम केले होते. सिनेमाच्या पूर्वार्धात आपल्या हळव्या मित्राला कणखर बनवणारी गोखले यांची भूमिका अजूनही सर्वांच्या लक्षात आहे, ‘तू नट म्हणून भिकारडा आहेसच पण माणूस म्हणून तू…’ या वर वर कडव्या वाटणाऱ्या वाक्यातील काळजी, प्रेम, करुणा गोखले यांनी अत्यंत सुंदररित्या दाखवून दिली होती. सिनेमाच्या उत्तरार्धात जेव्हा गोखलेंचं पात्र मृत्यूशी झुंज देत होतं तेव्हा त्याच मित्राकडे मन मोकळं करणारा एक सीनने प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणलं होतं. याच चित्रपटही एक छोटी क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

विक्रम गोखले नटसम्राट डायलॉग व्हिडीओ

हे ही वाचा<< विक्रम गोखले यांना ‘या’ चित्रपटासाठी मिळाला होता राष्ट्रीय पुरस्कार; Video बघून डोळ्यात येईल पाणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, आज संध्याकाळी ६ वाजता वैकुंठ स्मशान भूमी येथे विक्रम गोखले यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. प्रदीर्घ आजारामुळे विक्रम गोखले यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात मागील १७ दिवसांपासून व त्यांनी मृत्यूशी कडवी झुंज दिली पण आज अखेरीस त्यांची प्राणज्योत मालवली