बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान हा त्याच्या आगामी ‘विक्रम वेधा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात तो एक पोलिस ऑफिसरच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे. नुकतीचच सैफ अली खान, राधिका आपटे, सत्यदिप मिश्रा आणि चित्रपटाचे दिग्दर्शक यांनी कॉमेडीयन कपिल शर्माच्या कार्यक्रमात हजेरी लावली. या कार्यक्रमात चित्रपटातील कलाकारांनी खूप धमाल केली.

कपिलने या चित्रपटातील कलाकारांबद्दल फारशा माहीत नसलेल्या गोष्टी शोधून काढल्या होत्या. अभिनेता सत्यदिप मिश्रा हे इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये कार्यरत होते हे कपिलने या कार्यक्रमात जाहीर केलं. यावेळी क कपिलने हसत खेळत सैफला सत्यदिप यांना पतौडी पॅलेस दाखवून आणला का?असा प्रश्न विचारला. यावर मस्करी करत खोटा खोटा बचाव करत सैफ म्हणाला, “मी एक चांगला नागरिक आहे, मला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून बरेच पुरस्कार मिळतात, माहितीये का तुला?”नंतर मात्र सत्यदिप यांनी स्पष्ट केलं की ते परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत परंतु त्यांनी ऑफिसर म्हणून कधीच काम केलं नव्हतं.

आणखी वाचा : अली आणि रिचाच्या लग्नाला हॉलिवूड स्टार्सही लावणार हजेरी; समारंभात पाहुण्यांना फोन वापरता येणार पण…

कपिलने या कार्यक्रमात सैफ, करीना आणि त्यांच्या बाळाचे जून फोटोसुद्धा लोकांसमोर शेअर केले. त्यातील एका फोटोमध्ये सैफ आणि तैमुर बसले आहेत आणि तैमुर त्याच्या वहीत काहीतरी खरडतोय. त्यांचा हा फोटो पाहून कपिल म्हणाला, “तैमुर सैफच्या स्क्रिप्टमधून रोमॅंटिक सीन्स कट करतोय वाटतं.” यावर सैफही इतरांना दाद देत मनमोकळेपणे हसला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कपिल शर्माच्या या कार्यक्रमात हृतिक रोशन हजर नव्हता. हृतिक आणि सैफचा ‘विक्रम वेधा’ हा चित्रपट येत्या ३० तारखेला प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट तेलुगी चित्रपटाचा रिमेक आहे. याबरोबरच सैफच्या ‘आदिपुरुष’ चित्रपटाचीसुद्धा चांगलीच चर्चा आहे. यामध्ये सैफ मेगास्टार प्रभासबरोबर झळकणार आहे.