“शमिता आणि शिल्पा तुमच्या बहिणी आहेत का?” अभिनेत्रीच्या आईने दिलं मजेशीर उत्तर

शमिता आणि शिल्पा प्रमाणेच त्यांची आई सुनंदा देखील इन्स्टाग्रामवर सक्रिय असल्याचे दिसत आहे.

shamita
Photo-Instagram

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीची बहीण शमिता शेट्टी ‘बिग बॉस ओटीटी’ च्या घरातून बाहेर पडताच सतत चर्चेत आहेत. बिग बॉस ओटीटीच्या पहिल्या सिझनची विजेती जरी दिव्या अग्रवाल झाली असली तरी शमिता शेट्टी बिग बॉस ओटीटीच्या घरातली सर्वात चर्चित स्पर्धक होती. शमिता आणि शिल्पा प्रमाणेच त्यांची आई सुनंदा देखील इन्स्टाग्रामवर सक्रिय असल्याचे दिसत आहे. त्यांनी इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला असून हा फोटो त्यांच्या चाहत्यांना प्रचंड प्रमाणात आवडला आहे.

शमिताच्या आईने शेअर केलेला फोटो त्या बिग बॉस ओटीटीच्या घरात प्रवेश करण्याची अगोदरचा आहे. अभिनेत्रीच्या आईच्या या पोस्टवर एका युजरच्या कमेंटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. सुनंदा शेट्टीने दोन दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर नारंगी आणि गुलाबी रंगाच्या साडीमध्ये पोज देतानाचा एक फोटो पोस्ट केला होता. या फोटोत त्या अतिशय सुंदर दिसत आहेत. ‘बिग बॉस ओटीटी’ च्या फॅमिली वीकच्या वेळेस त्या ही साडी नेसल्या होत्या. हा सुंदर फोटो शेअर सुनंदा यांनी लिहिले, “बिग बॉसच्या घरात एका महिन्यानंतर माझ्या मुलीची आणि माझी भेट होणार.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Shetty Sunanda (@sunandashetty10)

या फोटोवर एका युजरने कौतुक करत कमेंट केली आहे. त्याने शमिता आणि शिल्पाच्या आईला प्रश्न विचारला, “सुनंदा शेट्टी खूपचं सुंदर दिसत आहे!!!शमिता आणि शमिता शेट्टी तुमच्या बहीणी आहेत का?” ही कमेंट पहून त्यांनी रीप्लाय  दिला, ” धन्यवाद..त्या माझ्याचं मुली आहेत.”

shamita1
(Photo-Instagram)

शमिता बिग बॉस ओटीटीच्या घरातून परत आल्यावर शिल्पाने देखील पोस्ट शेअर करत तिचे स्वागत केले आहे. या फोटोला तिने कॅप्शन दिलं, “माझी टुनकी परत आली आणि आता तुला घट्ट मिठी मारण्यापासून मला आता कोणी थांबवू शकत नाही. बहीणा बाई घरी तुझे खूप खूप स्वागत आहे.”

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Viral social shilpa shetty and shamita shetty are your sisters the actress mother gave such an answer to the fans aad

ताज्या बातम्या