बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली यांच्या प्रेम प्रकरणाची चर्चा तशी नवी नाही. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा गेल्या बऱ्याच काळापासून एकमेकांसोबत सर्वात जास्त वेळ व्यतीत करत आहेत. काही दिवसांपूर्वीच नाताळ आणि नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी हे दोघेही उत्तराखंडला गेले होते. विराट आणि अनुष्का यांचे सुट्ट्यांचा आनंद घेतानाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच गाजले होते. जवळपास आठवडाभराच्या सुट्टीनंतर हे दोघे ज्यावेळी परतले त्यावेळीसुद्धा विमानतळावर या दोघांनाही एकत्र पाहण्यात आले. उत्तराखंडमधून परतल्यानंतर हे दोघे सध्या नवीन घर पाहण्यासाठी गेल्याचे दिसले. वरळीमध्ये फ्लॅट पाहण्यासाठी आल्यानंतरचे विराट अनुष्का यांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. ‘पिंकविल्ला’ने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकांऊटवरुन अनुष्का आणि विराट या दोघांचा एक फोटो शेअर केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ज्या इमारतीमध्ये  दोघे फ्लॅट पाहण्यासाठी गेले होते, त्या इमारतीचे नाव ‘ओंकार १९७३’ असे असल्याचे समजते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोघांच्या पसंतीनुसार या फ्लॅटचे काम सुरु आहे. विराट आणि अनुष्का हे ख्रिसमस सेलिब्रेशनसाठी देहरादूनला गेल्याची बातमी काही दिवसांपूर्वीच आली होती. हृषिकेश येथील एका रेसॉर्टमध्ये त्यांनी सुट्ट्टीचे दिवस सोबत घालविले. यादरम्यान १ जानेवारी रोजी विराट कोहली आणि अनुष्का यांचा साखरपुडा होणार या वृत्ताचा देखील चांगलाच गाजावाजा झाला. त्यानंतर संताप व्यक्त करत विराट कोहलीने हे वृत्त फेटाळून लावले होते. आमचा साखरपुडा करण्याचा विचार नाही आणि जर आम्ही करणार असू तर ते लपविण्याचे काही कारण नाही, असे विराटने म्हटले होते.

इंग्लंडचा संघ सध्या भारतामध्ये असून भारत आणि इंग्लंड यांच्यात एकदिवसीय मालिका रंगणार आहे. धोनीने कर्णधार पद सोडल्यानंतर नवीन वर्षात विराट कोहली भारताची कमान संभाळताना दिसणार आहे. अनुष्काविषयी बोलायचे तर अनुष्का नुकतीच ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमामुळे  चांगलीच चर्चेत आली होती. या कार्यक्रमामध्ये तिने विराटसोबत जाणे टाळल्याचे देखील बोलले गेले. करणने या कार्यक्रमात ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटावेळी अनुष्का माझी क्रश होती, असे म्हटले. यावेळी अनुष्कानेही करणला हजरी जबाबीपणाणे उत्तरे दिल्याचे पाहायला मिळाले होते. दरम्यान अनुष्का-विराट या दोघांना एकत्र फिरताना पाहिल्यामुळे आगामी भारत आणि इंग्लंड दरम्यानच्या सामन्यात विराट कोहलीचा खेळ पाहायला अनुष्का मैदानात दिसणार का? हे पाहणे देखील औत्सुकतेचे असणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virat kohli and anushka sharma visit to their bungalow in worli
First published on: 11-01-2017 at 22:52 IST