करण जोहरचा ‘कॉफी विथ करण’ हा कार्यक्रम फार लोकप्रिय आहे. सध्या या कार्यक्रमाचे सातवे पर्व सुरु आहे. आतापर्यंत बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी या कार्यक्रमाला हजेरी लावली आहे. करण आणि त्याच्या या कार्यक्रमामध्ये आलेल्या पाहुण्यांनी केलेल्या वादग्रस्त वर्तव्यांमुळे ‘कॉफी विथ करण’ शो सतत चर्चेत असतो. गुरुवारी या कार्यक्रमाचा नवीन भाग प्रदर्शित झाला. या भागामध्ये सोशल मीडियावरील सेलिब्रिटींना बोलवण्यात आले होते.

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री गेल्या काही दिवसापासून चर्चेचा विषय बनले आहेत. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये त्यांना ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमामध्ये जाणार का असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी या कार्यक्रमाबद्दलचे त्याचे मत मांडत करणवर जहरी टीका केली. ब्रुट इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये ते म्हणाले, “मी धार्मिक विचार मानणारा व्यक्ती आहे. माझे आयुष्य सेक्स आणि गॉसिप्सभोवती फिरत नाही. त्या कार्यक्रमामध्ये योगदान देण्यासाठी माझ्याजवळ काहीही नसल्यामुळे मी त्या कार्यक्रमाला कधीही जाणार नाही. मी मध्यमवयीन माणूस आहे. मला दोन मुलं आहेत. सेक्स हा माझ्या आयुष्यातला सर्वात महत्त्वपूर्ण विषय नाहीये”

vasai, virar, palghar, lok sabha election 2024, Hitendra Thakur
सर्व पक्षांनी मलाच पाठिंबा द्यावा, हितेंद्र ठाकूर यांची चित्रफित प्रसारित
Meenakshi Shinde
आचारसंहितेच्या कालावधीत बचतगटांना आनंद आश्रमातून अनुदान वाटप ? शिवसेनेच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदेंविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार
Sanjay Shirsat on Raj Thackeray GudhiPadva
राज ठाकरे आणि महायुतीमध्ये काय ठरलं? संजय शिरसाट म्हणाले, “यावेळी गुढीपाडवा मेळाव्यात…”
Understanding the scope and depth of Creative Design and how to pursue a career in it
डिझाईन रंग-अंतरं:ग ‘डिझाईन’ कसं बदलतंय तुमचं जग..!

आणखी वाचा – “आज मी तुमच्यामुळे…”, रश्मिका मंदानाने माधुरी दीक्षितबद्दल व्यक्त केली कृतज्ञता

ते पुढे म्हणाले, “मला तेथे बोलायला विषयच नसतील. आता आपले संभाषण सुरु आहे. मी तुमच्यासह सेक्सवर किंवा त्याव्यतिरिक्त अन्य कोणत्याही विषयावर बोलू शकतो. त्या कार्यक्रमातील कृत्रिमतेमुळे तेथे जाऊन गप्पा मारणे मला जमणार नाही. मी धार्मिक वृत्तीचा आहे. मी आणि माझी पत्नी खूश आहोत. पण माझ्या आयुष्यात सेक्स हा मुद्दया केंद्रस्थानी नाहीये. माझ्या मते. हा फालतू कार्यक्रम आहे. ते काय करत आहेत, काय बोलत आहेत याचा संदर्भच लागत नाही. कोणालाही त्याचं बोलणं रिलेट होत नाही. ते त्यांच्या छोट्या वर्तुळामध्ये राहून त्यांच्याच मित्रांना खूश करायचा प्रयत्न करत असतात आणि एखादी वाहिनी याचे त्यांना पैसे देते.”

आणखी वाचा – Video : ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वातील पहिल्या स्पर्धकाचे नाव समोर, बोल्ड लूकने वेधले लक्ष

‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटामुळे विवेक अग्निहोत्रींना प्रसिद्धी मिळाली. या चित्रपटाद्वारे त्यांनी काश्मीरमधील पंडितांची व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ते सध्या त्यांच्या ‘दिल्ली फाईल्स’ या आगामी चित्रपटाच्या कामात व्यग्र आहेत.