War 2 Box Office Collection Day 10 : बॉलीवूडचा अभिनेता हृतिक रोशन आणि दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनियर एनटीआर यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘वॉर २’ चित्रपट १४ ऑगस्टला जगभरात प्रदर्शित झाला आहे. त्यामध्ये अभिनेत्री कियारा अडवाणी प्रमुख भूमिकेत झळकली आहे. हा चित्रपट अयान मुखर्जी यांनी बनवला होता आणि त्याची निर्मिती वायआरएफने केली होती.
हा चित्रपट रजनीकांत यांच्या ‘कुली’ चित्रपटाशीही भिडला. एवढे सर्व असूनही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करीत आहे. या चित्रपटाने अनेक मोठ्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत. आता हा चित्रपट हृतिक रोशनच्या कारकिर्दीतील तिसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला आहे.
दहाव्या दिवशी ‘वॉर २’ने इतकी कमाई केली
सॅकनिल्कच्या मते, चित्रपटाने दुसऱ्या शनिवारी (२३ ऑगस्ट) ६.२५ कोटी रुपये कमावले आहेत. आतापर्यंत चित्रपटाचे एकूण कलेक्शन २१४.५ कोटी झाले आहे. त्याबरोबरच चित्रपटाने हृतिक रोशनच्या ‘फायटर’ चित्रपटाचा विक्रम मोडला आहे. ‘फायटर’चे लाइफटाइम बॉक्स ऑफिस कलेक्शन २१२.७९ कोटी होते.
हा चित्रपट आता ‘क्रिश ३’चा बॉक्स ऑफिस रेकॉर्ड मोडण्याच्या शर्यतीत आहे. ‘क्रिश ३’ने २३१.७९ कोटींची कमाई केली होती. हा चित्रपट हृतिक रोशनच्या कारकिर्दीतील तिसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला आहे. त्या यादीत ‘वॉर पहिल्या क्रमांकावर आहे. वॉर’ने ३०३.३४ कोटींचा बॉक्स ऑफिस कलेक्शन केले होते. ‘क्रिश ३’ दुसऱ्या क्रमांकावर आहे.
‘वॉर २’चे बॉक्स ऑफिस कलेक्शन
‘वॉर’ने पहिल्या दिवशी ५२ कोटींची कमाई केली. त्यानंतर चित्रपटाने दुसऱ्या दिवशी ५७.८ कोटी, तिसऱ्या दिवशी ३३.२५ कोटी, चौथ्या दिवशी ३२.६५ कोटी, पाचव्या दिवशी ८.७५ कोटी, सहाव्या दिवशी नऊ कोटी, दहाव्या दिवशी ५.७ कोटी व नवव्या दिवशी चार कोटींची कमाई केली. पहिल्या आठवड्यात चित्रपटाने २०४.२५ कोटींची कमाई केली. चित्रपटात कियारा अडवाणीदेखील दिसली आहे. चित्रपटातील कियाराचे बिकिनी सीन्स खूप व्हायरल झाले आहेत.