War 2 Box Office Collection Day 3 : बॉलीवूडचा अभिनेता हृतिक रोशन आणि दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनियर एनटीआर यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘वॉर २’ चित्रपट १४ ऑगस्टला जगभरात प्रदर्शित झाला. त्यामध्ये अभिनेत्री कियारा अडवाणी प्रमुख भूमिकेत झळकली आहे.

१४ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित झालेल्या हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर यांच्या या चित्रपटाच्या कमाईत शनिवारी मोठी घसरण झाली. हिंदी, तेलुगू व तमीळ या तिन्ही आवृत्त्यांमधील या चित्रपटाचे तिसऱ्या दिवशी नुकसान झाले आहे. त्याने फक्त तीन दिवसांत सलमान खानच्या ‘सिकंदर’ चित्रपटाच्या कमाईला मागे टाकले आहे.

गुरुवारी (१४ ऑगस्ट) प्रदर्शित झालेल्या ‘वॉर २’ने पहिल्या दिवशी तिन्ही भाषांमध्ये ५२ कोटी रुपये कमावले. त्यानंतर स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ‘वॉर २’ला खूप फायदा झाला. शुक्रवारी त्याने ५७.३५ कोटी रुपये कमावले; पण जन्माष्टमीच्या दिवशी चित्रपटाचा तिसरा दिवस होता. त्या दिवशी चित्रपटाच्या कमाईला मोठा धक्का बसला. अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘वॉर २’चे बजेट ४०० कोटी रुपये आहे. अशा परिस्थितीत हिट होण्यासाठी त्याला त्याच्या कमाईचा वेग वाढवावा लागेल.

‘वॉर २’ बॉक्स ऑफिस कलेक्शन

‘सॅकनिल्क’च्या मते, ‘वॉर २’ने शनिवारी देशात एकूण ३३.२५ कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. अशा प्रकारे तीन दिवसांत भारतीय बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची एकूण कमाई १४२.६० कोटी रुपये झाली आहे. तिसऱ्या दिवशी या स्पाय अॅक्शन चित्रपटाने हिंदी आवृत्तीत २६ कोटी रुपये कमावले आहेत, जी कमाई एक दिवसापूर्वी ४४.५० कोटी रुपये होती.

दुसरीकडे रजनीकांत, श्रुती हासन, नागार्जुन, सत्यराज स्टारर ‘कुली’ चित्रपटाने तिसऱ्या दिवशी ‘वॉर २’ला मागे टाकले आहे. पहिल्या दिवशी ‘कुली’ने ६५ कोटींची कमाई करून हृतिक-एनटीआरच्या चित्रपटाला मागे टाकले होते. ‘वॉर २’ कदाचित दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्या चित्रपटापेक्षा मागे असेल; पण अवघ्या ७२ तासांतच त्याने सलमान खानच्या ईदला प्रदर्शित झालेल्या ‘सिकंदर’ला मागे टाकले आहे.