आलिया भट आणि अर्जुन कपूर यांच्या आगामी ‘२ स्टेट्स’ चित्रपटातील मस्त मगन हे रोमॅण्टिक गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे.
मस्त मगन हे गाणे ऐकणा-यास प्रेमात पाडेल असे आहे. हे गाणे पाहिल्यावर चेतन भगतने ट्विट केले की, “माहित नाही का? पण हे गाणे पाहिल्यावर मला रडू आले. २’ स्टेट्स’मधील सुंदर मस्त मगन व्हिडिओ.” शंकर, एहसान आणि लॉय यांनी ‘२ स्टेट्स’ला संगीत दिले असून अरिजीत सिंग आणि चिन्मयी श्रीपदाने मस्त मगन गाणे गायले आहे.
अभिषेक वर्मन दिग्दर्शित आणि करण जोहरची निर्मिती असलेल्या या चित्रपटात रोहित रॉय, अमृता सिंग, शिव कुमार सुब्रमण्यम् आणि रेवती यांच्या सहायक भूमिका आहेत. हा चित्रपट १८ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 28th Mar 2014 रोजी प्रकाशित
पाहाः ‘२स्टेट्स’मधील ‘मस्त मगन’ आलिया आणि अर्जुन
आलिया भट आणि अर्जुन कपूर यांच्या आगामी '२ स्टेट्स' चित्रपटातील मस्त मगन हे रोमॅण्टिक गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे.

First published on: 28-03-2014 at 11:02 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Watch arjun kapoor alia bhatt get romantic in mast magan from 2 states