‘शाहिद’ चित्रपटातील अभिनयाकरिता राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करणा-या राजकुमार राव आता ‘सिटीलाईटस्’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
चांगलं आयुष्य, सुखाची नोकरी आणि दोन घासाच्या शोधासाठी भुलभुलैय्या मुंबईत येतात. पण, नोकरी आणि पैसे मिळत नाहीत तेव्हा पत्नीवर बारबाला बनण्याची वेळ येते. उपाशी पोटी अनेक रात्री काढल्यावर चित्रपटात दीपक सिंगची भूमिका साकारणा-या राजकुमारवर एक भक्कम पाऊल उचलण्याची वेळ येते, अशी चित्रपटाची कथा आहे. ‘सिटीलाईटस्’ या चित्रपटातून दिग्दर्शक हंसल मेहता आणि अभिनेता राजकुमार राव ही जोडी पुन्हा एकदा एकत्र आली आहे. मुकेश भट निर्मित ‘सिटीलाईटस्’ ३० मे रोजी प्रदर्शित होणार आहे.