‘रमाबाई आंबेडकर’,’आम्ही चमकते तारे’, व ‘श्यामची शाळा’ या चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर साईनाथ चित्र यांची निर्मिती असलेला ‘वेलडन बॉईज’ हा नव्याकोऱा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लहान मुलांच्या जीवनावर या चित्रपटाची कथा गुंफण्यात आली आहे. प्रकाश जाधव यांचे या अगोदरचे सिनेमे देखील लहान मुलांच्या आयुष्यावर प्रकाश टाकणारे होते. ‘वेलडन बॉईज’ या चित्रपटाचे लेखन अशोक बाफना व किशोर ठाकूर यांचे असून अशोक मानकर व महेंद्र पाटील यांनी संवाद लिहिले आहेत. या सिनेमाचं चित्रीकरण व तांत्रिक गोष्टी पूर्ण झाल्याची माहिती दिग्दर्शक प्रकाश आत्माराम जाधव यांनी दिली आहे.

marathi actor Makarand Anaspure appeared in the look of CM Eknath Shinde in the movie Juna Furniture
‘जुनं फर्निचर’ चित्रपटात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या लूकमध्ये झळकले ‘हे’ प्रसिद्ध अभिनेते, पाहा फोटो
First glimpse of Kiran Gaikwad movie Dev manus released
‘देवमाणूस’ किरण गायकवाडच्या चित्रपटाची पहिली झलक प्रकाशित
actor akshay kumar talk about movie bade miyan chote miyan
‘अपयशाने खचत नाही’
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर

प्रत्येक शाळेत जसे हुशार विद्यार्थी असतात तसेच खोडकर,उनाड व मस्तीखोर विद्यार्थीही असतात. परंतु या मुलांमध्येही कुठेतरी चांगले गुण दडलेले असतात. या मस्तीखोर मुलांचे अंधकारमय भविष्य शिक्षकांमार्फत कसे प्रकाशमय करता येईल असा एक प्रयत्न या चित्रपटातून केलेला आहे. चित्रपटातील आशिष निनगुरकर व अशोक मानकर लिखित गाण्यांना श्रीरंग आरस व एस.पी.सेन यांनी संगीत दिले असून पल्लवी केळकर,श्यामल सावके,गीता व जे.पी दत्ता यांनी ही गाणी गायली आहेत.

हे देखील वाचा: वीकेण्डसाठी मनोरंजनाची खास ट्रीट, तुम्ही काय पाहताय या विकेण्डला ?

या चित्रपटात मोहन जोशी,विजय पाटकर,शिल्पा प्रभूलकर,प्रिय रंजन,विनोद जॉली,महेंद्र पाटील व आशिष निनगुरकर यांच्याबरोबर अनेक बालकलाकारांनी यात महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. हा चित्रपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.