अभिनेता श्रेयस तळपदे सोशल मीडियावर फारसा सक्रिय नसतो. परंतु जेव्हा कधी तो सोशल मीडियावर येतो त्यावेळी सर्वांचेच लक्ष वेधून घेतो. यावेळी त्याने एक आश्चर्चचकित करणारा फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो पाहून श्रेयसला झालं तरी काय? असा प्रश्न नक्कीच तुमच्या मनात डोकावेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सर्वाधिक वाचकपसंती – GOT मधील खलनायक खऱ्या आयुष्यात सुपरहिरो; केला वजन उचलण्याचा World Record

असं काय आहे या फोटोमध्ये?

श्रेयसने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये त्याच्या एका डोळ्याला पट्टी लावलेली दिसत आहे. “पायरेट्स ऑफ क्वारंटाईन, मी चुकीच्या जागेवर मास्क लावलेला नाही. तुम्ही हा फोटो पाहून सांगू शकता ही पट्टी मी का लावली आहे. धन्यवाद डॉक्टर सोनल जाधव.” अशा आशयाची कॉमेंट त्याने या फोटोवर केली आहे. ही कॉमेंट वाचून श्रेयसला काही दुखापत तर झाली नाही ना? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी या फोटोवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

सर्वाधिक वाचकपसंती – “टाटा अंबानी केवळ नफ्यासाठी करतात कोट्यवधींची मदत”; अभिनेत्याचा खळबळजनक आरोप

श्रेयस तळपदे मराठी सिनेसृष्टीतील नामांकित अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. ‘दामिनी’ या मालिकेतून श्रेयस प्रकाशझोतात आला होता. त्यानंतर त्याने ‘रेशमगाठ’, ‘झुळूक’, ‘पोश्टर बॉईज’, ‘पछाडलेला’ अशा अनेक मराठी चित्रपटांमध्ये अभिनय केला. यांशिवाय ‘गोलमाल’, ‘ओम शांती ओम’, ‘इक्बाल’, ‘अपना सपना मनी मनी’ यांसारख्या काही हिंदी चित्रपटांमध्येही त्याने काम केले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What happened to shreyas talpades eye mppg
First published on: 04-05-2020 at 16:22 IST