scorecardresearch

Video: एक्स गर्लफ्रेंड कतरिनासमोर आलियानं रणबीर कपूरला केलं प्रपोज अन्…

आलिया भट्टला डेट करण्याआधी रणबीर कपूर कतरिना कैफसोबत रिलेशनशिपमध्ये होता.

alia bhatt, alia bhatt marriage, ranbir kapoor, katrina kaif, ranbir kapoor ex girlfriend, alia bhatt boyfriend, alia ranbir marriage, alia ranbir wedding, आलिया भट्ट, कतरिना कैफ, रणबीर कपूर, आलिया भट्ट लग्न, रणबीर कपूर एक्स गर्लफ्रेंड, आलिया रणबीर लग्न
आलिया भट्ट बॉयफ्रेंड रणबीर कपूरला सर्वांसमोर प्रपोज करताना आणि आय लव्ह यू म्हणताना दिसत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर मागच्या काही वर्षांच्या रिलेशनशिपनंतर लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. लग्नाचं स्थळ ते पाहुण्यांची यादी सर्वच गोष्टींची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. अशातच सध्या एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात आलिया भट्ट बॉयफ्रेंड रणबीर कपूरला सर्वांसमोर प्रपोज करताना आणि आय लव्ह यू म्हणताना दिसत आहे. ज्यावर रणबीरची एक्स गर्लफ्रेंड कतरिना कैफची प्रतिक्रिया तर पाहण्यासारखी आहे.

आलिया भट्टचा हा व्हिडीओ काही वर्षांपूर्वीचा आहे. जेव्हा आलियाला तिच्या ‘राजी’ चित्रपटासाठी पुरस्कार मिळाला होता. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर आलियानं सर्वांचे आभार मानले आणि याचवेळी त्यानं अचानक रणबीरला सर्वांसमोर प्रपोज केलं होतं. आलियाचा हा अंदाज पाहून उपस्थित सर्वच हैराण झालेले दिसतात आणि रणबीर कपूर तर चक्क लाजताना दिसत आहे.

या व्हिडीओमध्ये एकीकडे लाजून आपला चेहरा लपवताना दिसत आहे. तर आलिया रणबीरला सर्वांसमोर आय लव्ह यू बोलत असलेली पाहून रणबीरची एक्स गर्लफ्रेंड कतरिना कैफला मात्र धक्का बसलेला दिसत आहे. ती या दोघांकडे एकटक पाहत राहते. रणबीर आणि कतरिनाच्या नात्याबद्दल बोलायचं तर आलियाला डेट करण्याआधी तो कतरिनासोबत रिलेशनशिपमध्ये होता. मात्र काही कारणानं दोघं वेगळे झाले. त्यानंतर रणबीरनं आलियाला डेट करण्यास सुरुवात केली मात्र असं असताना आलिया आणि कतरीना यांच्यातील मैत्री अद्याप कायम आहे. काही महिन्यांपूर्वीच कतरिनानं अभिनेता विकी कौशलसोबत लग्नगाठ बांधली.

दरम्यान आलिया भट्ट आणि रणबीर कपूर येत्या १७ एप्रिलला लग्न करणार असल्याचं बोललं जातंय. दोघांचं लग्न पंजाबी पद्धतीने आर के हाऊसमध्ये होणार असल्याचीही चर्चा आहे. लग्नाच्या विधी १३ एप्रिलपासून सुरू होणार आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: When alia bhatt propose to ranbir kapoor front of his ex girlfriend katrina kaif mrj

ताज्या बातम्या