Amitabh Bachchan and jaya Bachchan Old Video Viral : अमिताभ बच्चन हे केवळ एक उत्तम अभिनेतेच नाहीत तर एक उत्तम गायकदेखील आहेत. त्यांनी त्यांच्या चित्रपट कारकिर्दीत अनेक गाणी गायली आहेत, जी हिट ठरली आहेत. त्यांचे एक गाणे खूप लोकप्रिय झाले आहे. बिग बींच्या संस्मरणीय गाण्यांपैकी एक गाणे त्यांच्या ‘लावारिस ‘ (१९८१) चित्रपटातील होते, ज्याचे बोल ‘मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है’ असे आहेत. हे त्यांचे सदाबहार गाणे आहे.
अमिताभ बच्चन यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते जया बच्चन यांच्याबरोबर हे गाणे सादर करताना दिसत आहेत. ८० च्या दशकात प्रदर्शित झालेला ‘लावारिस ‘ (१९८१) हा चित्रपट अमिताभ बच्चन यांच्या हिट चित्रपटांपैकी एक आहे. त्यात त्यांचे ‘मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है’ हे गाणे चित्रित करण्यात आले होते.
चित्रपटातील बिग बींच्या अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली, त्यामुळे आजही जेव्हा ते या गाण्यावर परफॉर्म करताना दिसतात तेव्हा ते चाहत्यांसाठी एखाद्या भेटवस्तूपेक्षा कमी नाही. दरम्यान, त्यांचा एक जुना व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये ते जया बच्चन यांच्याबरोबर या गाण्यावर परफॉर्म करताना दिसत आहेत. एका लाईव्ह स्टेज शोदरम्यान अमिताभ बच्चन पत्नी जया बच्चन यांच्याबरोबर पोहोचले होते.
या लाईव्ह स्टेज शोदरम्यान अमिताभ बच्चन यांनी ‘लावारिस ‘ चित्रपटातील ‘मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है’ हे गाणे गायले. जया बच्चनदेखील त्यांच्याबरोबर स्टेज शेअर करताना दिसल्या. ९० च्या दशकातील या कार्यक्रमात अमिताभ बच्चन काळ्या सूट आणि बूटमध्ये दिसले. स्टेजवर ते त्यांच्या पत्नीसमोर ‘जिसकी बीवी छोटी उसका भी बडा नाम है, गोद में उठा लो बच्चे का क्या काम है…’ हे गाणे गात होते.

व्हिडीओमध्ये असे दिसून येते की, लाईव्ह शोमध्ये अभिनेता जया बच्चन यांना उचलून घेऊन हे गाणे गात आहेत. त्याच वेळी या परफॉर्मन्समध्ये जयादेखील त्यांच्याबरोबर मस्ती करताना दिसत आहेत. अमिताभ यांचा हा मजेदार व्हिडीओ लहरेंच्या इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे.
व्हायरल व्हिडीओवर लोकांच्या कमेंट्स
या व्हिडीओवर एका युजरने लिहिले की, ‘जर तुमच्यात हिंमत असेल तर आज पुन्हा एकदा जयाजींसमोर हे गाणे गा.’ दुसऱ्या युजरने लिहिले की, ‘जया यांच्या जागी रेखा असत्या तर जास्त मजा आली असती.’ तिसऱ्या युजरने लिहिले की, ‘अमितजींचे सूर खूप चांगले आहेत.’ चौथ्या युजरने लिहिले की, ‘पूर्वी जयाजी खूप चांगल्या होत्या आणि आज विचारतही नाहीत.’ दुसऱ्या युजरने लिहिले की, ‘हा व्हिडीओ पाहिल्यानंतर रेखाजींना खूप वाईट वाटले असेल.’