बॉलिवूडची ‘मस्सकली’ सोनम कपूर आज तिचा ३६ वा वाढदिवस साजरा करतेय. असं म्हटलं जातं की बाप-लेकीचं नातंच असं आहे की जगातील सर्व नात्यांवर भारी पडेल. मुलगी जर आपल्या आईची लाडकी असेल तर वडिलांची ती अभिमान असते. प्रत्येक मुलींसाठी सुद्धा त्यांचं पहिलं प्रेम वडिलंच असतात. याच कारणांमुळे जोडीदार शोधतानाही मुली त्याच्यात आपल्या वडिलांचेच गुण शोधतात. असंच नातं बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूर व अभिनेता अनिल कपूर यांच्यामध्ये देखील आहे.

२००८ साली सोनम कपूरने अभिनेता फरहान अख्तरचा चॅट शो ‘ओय! इट्स फ्रायडे’ मध्ये मुलाखत दिली होती. यावेळी अभिनेता फरहान अख्तरने सोनमला एक प्रश्न विचारला. “तुला कसा लाईफ पार्टनर हवा आहे याची जर तुला जाहीरात द्यायची असेल तर काय देशील ?”. यावर उत्तर देताना सोनम कपूर म्हणाली, “जर तुम्ही माझ्या वडिलांपेक्षा उत्तम दिसत आहात, त्यांच्यापेक्षा जास्त लोकप्रिय, श्रीमंत आणि एक उत्तम व्यक्ती आहात, त्यांच्यापेक्षा चांगली मिशी असेल तर तुम्ही माझे जोडीदार बनू शकता !”

अभिनेत्री सोनम कपूरने ८ एप्रिल २०१८ मध्ये उद्योगपती आनंद आहुजासोबत लग्नगाठ बांधली. तिचा शाही विवाह सोहळा बराच चर्चेत आला होता. नुकतंच दोघांनी त्यांच्या लग्नाचा तिसरा वाढदिवस साजरा केला. एका मुलाखती दरम्यान सोनमने तिची लव्ह स्टोरी सुद्धा शेअर केली होती. यावेळी तिने सांगितलं, तिच्या एका मैत्रिणीने आनंद अहुजा यांच्या मित्राशी ओळख करून दिली होती. सोनमला त्यावेळी डेटिंग करण्यात रस नव्हता. इतकंच नव्हे तर सोनमला लग्नावर सुद्धा विश्वास नव्हता. पण त्यानंतर एका हॉटेलमध्ये गेल्यानंतर तिची आनंद आहुजासोबत भेट झाली. सोनम ही अभिनेता अनिल कपूरची मुलगी आहे हे त्यावेळी आनंद आहुजाला माहित नव्हतं. त्यानंतर बऱ्याच दिवसांनी रात्री २.३० वाजता आनंद आहुजा यांनी सोनमला फेसबूकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आणि मेसेज केला. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली आणि या मैत्रीचं रूपांतर पुढे जाऊन प्रेमात त्यानंतर लग्नात झालं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोनम कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर २०१९ मध्ये रिलीज झालेल्या ‘द जोया फॅक्टर’ चित्रपटात अभिनेता दलकीर सलमानसोबत झळकली होती. त्याच वर्षी ‘एक लड़की को देखा तो ऐसा लगा’ या चित्रपटात तिने काम केलं. त्यानंतर २०२० मध्ये नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या अनिल कपूरच्या ‘AK vs AK’ या चित्रपटात कॅमिओ करताना दिसून आली होती. लवकरच तिचा ‘ब्लाइंड’ नावाचा चित्रपटात भेटीला येणार आहे.