scorecardresearch

“या मुलासोबत तुझी स्पर्धा आहे”, राकेश बापटला पाहून जया बच्चन अभिषेकला म्हणाल्या होत्या…

राकेश बापटने शेअर केला बच्चन कुटुंबियांसोबतच्या भेटीचा किस्सा.

rakesh-bapat-abhishek-bachchan
(File Photo)

‘बिग बॉस ओटीटी’ या शोमुळे अभिनेता राकेश बापट चांगलाच चर्चेत आला आहे. खास करून राकेश आणि शमिता शेट्टीमधील जवळीक प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. ‘बिग बॉस ओटीटी’च्या घरातच राकेश आज त्याचा ४३वा वाढदिवस साजरा करतोय. राकेशने अनेक मालिका आणि काही बॉलिवूड सिनेमांमध्ये काम केलंय. मात्र ‘तुम बिन’ या राकेशच्या पहिल्याच सिनेमाने त्याला प्रेक्षकांची मोठी पंसती मिळवून दिली होती.

या सिनेमात राकेशची भूमिका मोठी नसली तरी खास करून तरुणींच्या मनावर त्याने जादू केली होती. ‘बिग बॉस ओटीटी’च्या घरात जाण्यापूर्वी राकेशने इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत सिनेमावेळी बच्चन कुटुंबियांसोबत झालेल्या एका भेटीचा अनुभव शेअर केला होता. ‘तुम बिन’ सिनेमाच्या स्क्रिनिंगवेळी राकेशने त्याच्या संपूर्ण कुटुंबाला पुण्याहून मुंबईला बोलावलं होतं. याचवेळी म्हणजेच १३ जुलै २००१ रोजी ‘तुम बिन’ सिनेमाआधी अमिताभ बच्चन यांच्या ‘अक्स’ या सिनेमाचं स्क्रिनिंग होणार होतं. यावेळी पार्किंगमध्येच राकेश आणि बच्चन कुटुंबीयांची भेट झाल्याचं राकेशने सांगितलं.

हे देखील वाचा: KBC 13: विरेंद्र सेहवागचे सौरव गांगुलीला चिमटे, धमाल उत्तरं ऐकून बिग बींना फुटलं हसू

राकेशने पुढे सांगितलं, “जयाजींनी मला पाहिलं आणि माझ्या जवळ येत म्हणाल्या ‘तू बापट आहेस ना? तुला भेटून खूप छान वाटतंय. तू खूप हुशार अभिनेता आहेस. मी अभिषेकला नेहमी तुझ्याबद्दल सांगते.’ काही दिवसांपूर्वीच रेफ्यूजी सिनेमा रिलीज झाला होता. त्यांनी अभिषेकला बोलावलं. त्याने माझी गळाभेट घेतली आणि म्हणाला, ‘मित्रा प्रत्येक वेळी तुझ्या सिनेमाचा प्रोमो पाहून माझी आई मला बोलावून म्हणते की या मुलाला बघ, याच्यासोबत तुझी स्पर्धा आहे.” राकेशने त्याचा हा अनुभव मुलाखतीमध्ये शेअर केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Raqesh Bapat (@raqeshbapat)

हे देखील वाचा: Viral Video: “कुणीतरी हिला साडी नेसायला शिकवा”; बोल्ड लूकमुळे मल्लिका शेरावत ट्रोल

यावेळी बिग बी अमिताभ बच्चन यांनी देखील राकेशचं कौतुक केल्याचं त्याने मुलाखतीत सांगितलं. तसचं बच्चन कुटुंबियांना भेटून राकेशच्या कुटुंबियांना आनंदाचा धक्काच बसल्याचं तो म्हणाला.

‘तुम बिन’ सिनेमानंतर राकेशने ‘दिल विल प्यार व्यार’ आणि ‘हीरोइन’ या सिनेमांमध्ये काम केलंय. त्याशिवाय त्याने ‘सात फेरे’,‘मर्यादा’, ‘कुबूल है’ आणि ‘बहू हमारी रजनीकांत’ या मालिकांमध्ये देखील महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-09-2021 at 15:23 IST

संबंधित बातम्या