बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता एकेकाळी वेस्ट इंडीज क्रिकेटपटू विव्हियन रिचर्डससोबत रिलेशनशिपमध्ये होत्या. त्या दोघांची एक मुलगी असून तिचे नाव मसाबा आहे. नीना यांनी एका मुलाखती दरम्यान खुलासा केला होता की त्यांनी मसाबाला तिच्या वडिलांबाबत सांगितले की आता आपण त्यांच्या संपर्कात राहणार नाही. हे ऐकून मसाबाला वाईट वाटले होते.

नीना गुप्ता यांनी २०१५ मध्ये एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांनी हा खुलासा केला आहे. जेव्हा मसाबा मोठी होत होती तेव्हा विव्हियन काही काळ तिच्या संपर्कात नव्हते. “मी मसाबाला सांगितले की तिचे वडील कुटुंबाचा हिस्सा नाही. सुरुवातीला, तिला वाईट वाटले की विव्हियन जवळपास २० वर्ष तिच्या संपर्कात नव्हते, परंतु त्यानंतर ते मसाबाच्या संपर्कात आले. विव्हियनशी संपर्क साधणे खूप अवघड आहे,” असे नीना म्हणाल्या.

आणखी वाचा : ‘वडिलांच्या तिसऱ्या लग्नाची तयारी…’, बॉयफ्रेंड नुपुरसोबत शॉपिंगकेल्यामुळे आयरा झाली ट्रोल

 

View this post on Instagram

 

A post shared by Masaba (@masabagupta)

नीना पुढे म्हणाल्या, “कधीकधी ते मसाबाच्या वाढदिवशी फोन करायचे. पण, कधी त्यांनी तीनतीन वर्षे फोन केला नाही. कधी कधी इथे आल्यावर भेटायचे आणि कधी कधी तर ते ही नाही. एवढ्या वेळात ते कसे आहेत हे मी ओळखून घेतलं होतं. जर मी त्यांना सांगितलं की मला कोणत्या गोष्टीची गरज आहे, तर ते कुठूनही ती गोष्ट शोधून आणतील. पण स्वत: च्या इच्छेने ते काहीही आणणार नाही. ते त्याच्या भावना व्यक्त करत नाही.”

आणखी वाचा : आमिर आणि किरण रावच्या घटस्फोटानंतर इम्रानच्या पत्नीने केली होती ‘ही’ पोस्ट

काही दिवसांपूर्वी नीना गुप्ता यांचे ‘सच कहूं तो’ पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकात त्यांनी सांगितले की त्या ५ वर्ष विव्हियन रिचर्डशी बोलल्या नव्हत्या. त्या म्हणाल्या, “मसाबा वडिलांना भेटून खूप उत्साही होती. जेव्हा मी तिला सांगितले की आपण तुझ्या वडिलांना भेटायला जात आहोत तेव्हा ती आनंदी झाली. पण, मसाबाच्या शाळेमुळे आम्हाला ती ट्रीप रद्द करावी लागली. मी विव्हियनला सांगितले की आम्ही आता भेटू शकणार नाही. पण, विव्हियनला त्याचे महत्त्व कळले नाही किंवा कदाचित, मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळविणे किती कठीण आहे हे मी त्यांना पटवून देऊ शकली नाही. त्यांना वाटले की मला त्यांना भेटायची इच्छा नाही. त्यांनी रागात फोन ठेवला आणि आम्ही ५ वर्षे बोललो नाही.”