दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता राम चरण व त्याची पत्नी उपासना लवकरच आईबाबा होणार आहेत. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी ही गूड न्यूज चाहत्यांना दिली आहे. लग्नानंतर दहा वर्षांनी राम चरणच्या घरी पाळणा हलणार आहे.

राम चरणने बाबा होणार असल्याची गुडन्यूज दिल्यानंतर त्याच्या पत्नीने आई होण्याबाबत केलेल्या वक्तव्याची चर्चा रंगताना दिसत आहे. राम चरणची पत्नी उपासनाने तिला गरोदरपणाची व आई होण्याची भीती वाटत असल्याचं एका मुलाखतीदरम्यान सांगितलं होतं. “लग्नानंतर आई व्हायचं की नाही, हा माझा प्रश्न आहे. आम्हाला आता मूल नको आहे. याबरोबरच गरोदरपणाची मला थोडी भीतीही वाटते. मी आता वजन कमी करत आहे. मूल कधी होऊ द्यायचं याबाबत आमचा निर्णय झाला आहे”, असं ती म्हणाली होती.

हेही वाचा >>भरत जाधव यांच्यासाठी गौरव मोरेची खास पोस्ट, लंडनमधील ‘तो’ फोटो शेअर करत म्हणाला…

राम चरण व उपासना यांनी १४ जून २०१२ साली विवाहबद्ध होत नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. आता लग्नाच्या दहा वर्षांनंतर त्यांच्या घरी पाळणा हलणार असल्याने दोघेही खूश आहेत.

हेही वाचा >> ‘बाळूमामा’ फेम अभिनेत्याची लगीनघाई, लग्नापूर्वीच्या विधींचा व्हिडीओ समोर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राम चरणने सोशल मीडिया अकाऊंटवरुन पोस्ट शेअर करत बाबा होणार असल्याची गोड बातमी चाहत्यांना दिल. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाइक्सचा वर्षाव केला आहे. अनेकांनी कमेंट बॉक्समध्ये शुभेच्छा देत राम चरण व त्याच्या पत्नीचं अभिंनदन केलं आहे.