सौंदर्य आणि उत्कृष्ट अभिनय यांच्या जोरावर हिंदी सिनेसृष्टीत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री म्हणून ‘श्रीदेवी’ यांना ओळखले जाते. श्रीदेवी यांच्या आकस्मिक निधनामुळे बॉलिवूडसह देशभरातील चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. दरम्यान श्रीदेवी यांच्या मृत्यूनंतर त्याच्या खासगी आयुष्यातील अनेक किस्से सांगितले जातात. करवा चौथच्या निमित्ताने श्रीदेवीच्या आयुष्यात घडलेला एक किस्सा सध्या चांगला व्हायरल होत आहे.

करवा चौथच्या दिवशी महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात. यावेळी महिला रात्री चंद्र पाहून तिचा उपवास सोडतात. बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्री हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करतात. श्रीदेव यादेखील हा सण साजरा करायच्या. त्यांच्यासाठी करवा चौथ हा सण फार खास होता. त्यामुळे श्रीदेवींच्या करवा चौथ निमित्ताने गाजलेले अनेक किस्से सांगितले जातात.

श्रीदेवी या चित्रपटांप्रमाणेच खऱ्या आयुष्यातही फार साध्या आणि घरगुती स्त्री होत्या. त्या नेहमी तिच्या घरी येणाऱ्या पाहुण्यांची काळजी घ्यायच्या. एकदा इंग्लिश विंग्लिश या चित्रपटाच्या शूटींगच्या निमित्ताने न्यूयॉर्कला गेल्या होत्या. त्यावेळी श्रीदेवींनी करवा चौथचा उपवास ठेवला होता. त्यावेळी त्यांनी सर्व प्रथा परंपरा पाळत हा उपवास केला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एकदा श्रीदेवींनी त्यांच्या करवाचौथचा उपवास विमानात सोडला होता. बॉनी कपूर आणि श्रीदेवी या मेक्सिकोहून लॉस एंजेलिसला विमानातून प्रवास करत होत्या. यावेळी त्यांनी रात्रीची फ्लाईट घेतली होती. मात्र त्या विमानात असल्याने त्यांना चंद्राला पाहता येत नव्हते. बरीच रात्र झाली होती. पण चंद्राला न पाहता उपवासही सोडता येत नव्हता. त्यावेळी त्यांनी पायलटकडे एक विनंती केली होती. “तुम्ही हे विमान काही क्षणांसाठी एखाद्या ठराविक दिशेकडे फिरवू शकता का, जिथून मला स्पष्टपणे चंद्र पाहता येऊ शकतो,” असे त्यांनी पायलटला सांगितले. यावेळी पायलटनेही तिला होकार दिला आणि त्यानंतर श्रीदेवीच्या म्हणण्यानुसार विमान चंद्र दिसेल अशा दिशेकडे फिरवले. यानंतर श्रीदेवींनी चंद्राला पाहिले. त्यानंतर ग्लासभर पाणी पिऊन त्यांनी उपवास सोडला.