बिग बॉस हिंदी’च्या नव्या सीझनमध्ये बॉलिवूड दिग्दर्शक साजिद खानला पाहून प्रेक्षक नाखूश होते. कित्येक सेलिब्रिटींनीही ‘बिग बॉस’च्या घरात साजिद खानला पाहून संताप व्यक्त केला. मीटू प्रकरणात अडकल्यामुळे चर्चेत आलेल्या साजिद खानवर अभिनेत्री शर्लिन चोप्राने पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. शर्लिन स्वतः बिग बॉसच्या तिसऱ्या सीझनचा भाग होती. शर्लिनने ट्वीट करत साजिदवर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत.

“साजिद खानने मला त्याचे गुप्तांग दाखवून शून्य ते १० दरम्यान रेटिंग दे असं म्हटलं होतं. आता मला ‘बिग बॉस’च्या घरात जाऊन त्याला रेटिंग द्यायचं आहे. विनयभंग करणाऱ्या व्यक्तीबरोबर पीडित महिला कसा व्यवहार करते, हेदेखील देशाला बघू दे. सलमान खान कृपया तुम्ही याबद्दल काहीतरी भूमिका घ्या”, असं म्हणत तिने सलमान खानला ट्वीटमध्ये टॅग केलं आहे.

आणखी वाचा : खुर्चीला खिळवून ठेवणाऱ्या थरारक ‘दुरंगा’च्या पुढील सीझनची घोषणा; लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

शर्लिन याआधीदेखील अशा बऱ्याच वादात अडकली होती. शर्लिन गेले काही दिवस सतत साजिद खानवर आरोप करत आहे. पण एकेकाळी तिने स्वतः चित्रपटात काम करण्यासाठी दिग्दर्शकांबरोबर तडजोड केल्याचं समोर आलं होतं. सोशल मीडियावरील बोल्ड लूक आणि बोल्ड वक्तव्यासाठी शर्लिन ओळखली जाते. काही वर्षांपूर्वी तिने चक्क बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनबरोबर रोमान्स करायची इच्छा व्यक्त केली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मध्यंतरी शर्लिनने तिला पुरुषांपेक्षा स्त्रिया जास्त आकर्षक वाटतात असं वक्तव्य केलं होतं. याच गोष्टीशी निगडीत जेव्हा तिला एका मुलाखतीमध्ये विचारलं गेलं तेव्हा तिने यावर खुलासा केला आणि तिला विद्या बालनबरोबर रोमान्स करायला आवडेल असंही सांगितलं. शर्लिन म्हणाली की, “मला विद्या बालनबरोबरक एखादा पॅशनेट सीन द्यायला आवडेल. मला विद्या प्रचंड आवडते. जर ती माझं म्हणणं ऐकत असेल तर मी तिला सांगू इच्छिते की मी तिच्या नवऱ्यापेक्षा तिची जास्त चांगली काळजी घेईन.” तिच्या या वक्तव्यामुळे तेव्हा चांगलाच गदारोळ माजला होता. शर्लिन सध्या साजिद खानवर प्रचंड टीका करत आहे आणि सोशल मीडियावरील मंडळी तिची आधीची वादग्रस्त वक्तव्यं व्हायरल करून तिला ट्रोल करत आहेत.